शैक्षणिक साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:22 IST2021-08-20T04:22:34+5:302021-08-20T04:22:34+5:30
जळगाव - भादली बुद्रूक येथील महात्मा गांधी विद्यालयातील २०० विद्यार्थ्यांना द रूरल एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शैक्षणिक साहित्याचे ...

शैक्षणिक साहित्य वाटप
जळगाव - भादली बुद्रूक येथील महात्मा गांधी विद्यालयातील २०० विद्यार्थ्यांना द रूरल एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी अर्चना राजे, मुख्याध्यापक डी.के. धनगर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
००००००००००००
शालेय गणवेश वाटप
जळगाव -भाऊसाहेब राऊत विद्यालयात शालेय गणवेश वाटपाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एल.एस. तायडे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून प्रकाश टेकवाणी होते. यावेळी ५० विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात कल्याणी टेकवाणी, कोमल गणानी, एस.एम.रायिसंग, एस.एस. बाविस्कर आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन विनोद कोळी यांनी केले तर आभार एस.डी. राजपूत यांनी मानले.
००००००००००
ड्रायव्हर संघटनेचा कार्यक्रम उत्साहात
जळगाव - जळगाव जिल्हा क्रांतिकारी ड्रायव्हर संघटनेच्यावतीने पाचवा वर्धापन साजरा करण्यात आला. यावेळी सुनील गुरव यांच्याहस्ते वाहनांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी खान्देश संघटक विशाल लिंगायत, विनोद सावकारे, मनोज शिंपी, जितेंद्र सोनार आदींची उपस्थिती होती.