पोळ्यानिमित्त ३१ शेतकऱ्यांना साज वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:19 IST2021-08-23T04:19:58+5:302021-08-23T04:19:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांवर अनेक वर्षांपासून आर्थिक, अस्मानी संकट निर्माण झाले आहेत. आता तर ...

पोळ्यानिमित्त ३१ शेतकऱ्यांना साज वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांवर अनेक वर्षांपासून आर्थिक, अस्मानी संकट निर्माण झाले आहेत. आता तर कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणखी संकटात सापडलेला आहे. येत्या पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात कृषी क्षेत्राविषयी व बळिराजाप्रती बांधीलकी म्हणून सुमिरा गांधी परिवार आणि नेहरू चौक बहुउद्देशीय मित्र मंडळातर्फे ३१ शेतकऱ्यांना पोळ्याचा साज वाटप करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुरेश भोळे, लता सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, उद्योजक संजय गांधी, नेहरू चौक मंडळाचे अध्यक्ष अजय गांधी, रवींद्र गणपत पाटील उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांना दोर, नाथ, म्होरक्या, गोंडे, सुताची लट, गेठा असा पोळ्याचा साज पर्यावरणपूरक थैलीसह मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आला. उपस्थितांनी मार्गदर्शन केले. प्रकाश आडते यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. प्रसंगी रिकेश गांधी, पीयूष गांधी, पंकज पाटील, रोहित शिरसाठ, दर्शन बारी, वैभव जगदाळे, धनंजय अमोदकर, प्रसाद विसपूते, शेखर सोनवणे, ऋषभ गांधी, चेतन माळी यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
या शेतकऱ्यांना मिळाला लाभ
दीपक वानखेडे, पांडुरंग नारखेडे, बळिराम अत्तरदे, पिंटू काटे, भूषण धनगर, राकेश बारेला, विलास पाटील, समाधान पाटील, राजू पाटील, नाना पाटील, राहुल सावळे, नरेंद्र सावळे, प्रदीप चौधरी, भारत कांचाने, नितीन चौधरी, बळिराम बारेला, उमेश पाटील, रावसाहेब पाटील, ज्ञानेश्वर हरणकर, भगवान शिंदे, समाधान पाटील, जनार्दन पाटील, रवींद्र पाटील, महेंद्र शिरसाठ, बबलू बारी, आदी शेतकऱ्यांना साज वाटप करण्यात आला.