इनरव्हीलतर्फे संगणक वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:15 IST2021-03-28T04:15:37+5:302021-03-28T04:15:37+5:30

जळगाव : सुशीलाबाई अत्रे प्राथमिक विद्यामंदिर शाळेला इनरव्हील क्लबच्यावतीने शनिवारी सहा संगणक व इतर साहित्य वाटप करण्‍यात आले. याप्रसंगी ...

Distribution of computers by Inner Wheel | इनरव्हीलतर्फे संगणक वाटप

इनरव्हीलतर्फे संगणक वाटप

जळगाव : सुशीलाबाई अत्रे प्राथमिक विद्यामंदिर शाळेला इनरव्हील क्लबच्यावतीने शनिवारी सहा संगणक व इतर साहित्य वाटप करण्‍यात आले. याप्रसंगी क्लबच्या अध्‍यक्षा डॉ. शीतल अग्रवाल तसेच रजना शाह, भारती शाह आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना वह्या व खाउ वाटपही करण्‍यात आला. कार्यक्रमात रजनी पाठक, उषा बाविस्कर आदींची उपस्थिती होती.

पुस्तक भेट

जळगाव : सुशीलाबाई वामनराव अत्रे प्राथमिक विद्यामंदिर शाळेला शनिवारी कवयित्री माया धुप्पड यांनी स्व:लिखित बडबडगीत, गाणी, गोष्टींची विविध पुस्तके भेट दिली. याप्रसंगी शाळेच्या समन्वयिका रजनी पाठक, मुख्याध्यापिका उषा बाविस्कर आदींची उपस्थिती होती.

महाराणा विद्यालयात होळीनिमित्त मार्गदर्शन

जळगाव : दि पूर्व खान्देश हिंदी शिक्षण संस्था संचलित महाराणा प्रताप माध्‍यमिक व उच्च माध्य़मिक विद्यालयात राष्ट्रीय हरित सेनेच्यावतीने विद्यार्थ्यांना होळीनिमित्त ऑनलाईन मार्गदर्शन करण्‍यात आले. हरितसेना प्रमुख विष्णू साबळे यांनी मुख्‍याध्यापिका साधना शर्मा यांच्या मार्गदशनाखाली कार्यक्रम घेवून नैसर्गिक रंग कसा तयार करावा, कोरोना रोखण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात आदींवर मागदर्शन केले.

Web Title: Distribution of computers by Inner Wheel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.