ग्रामपंचायतीच्या वतीने धनादेश वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:20 IST2021-08-12T04:20:46+5:302021-08-12T04:20:46+5:30

पिंप्री प्र. पा. येथील ग्रामपंचायतीने उत्कृष्ट असा कार्यक्रम अपंग बांधवांसाठी मदतीचा हात म्हणून गावातील २९ अपंग बांधवांना प्रत्येकी १ ...

Distribution of checks on behalf of Gram Panchayat | ग्रामपंचायतीच्या वतीने धनादेश वाटप

ग्रामपंचायतीच्या वतीने धनादेश वाटप

पिंप्री प्र. पा. येथील ग्रामपंचायतीने उत्कृष्ट असा कार्यक्रम अपंग बांधवांसाठी मदतीचा हात म्हणून गावातील २९ अपंग बांधवांना प्रत्येकी १ हजार रुपयांचा धनादेश पाचोरा येथील डॉ. भूषण मगर यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले. तसेच ग्रामपंचायतीने यावेळी आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी आरोग्य शिबिरात डॉ. भूषण मगर यांनी तीनशे नागरिकांची तपासणी केली.

याप्रसंगी सरपंच अमोल बाविस्कर, उपसरपंच कल्‍पना पाटील, सदस्य वंदना पाटील, किशोर पडीळ, कचरू पाटील, संगीता पाटील, अकिला तडवी, वाल्मीक तडवी, तुळसाबाई पाटील, पोलीस पाटील जयश्री पाटील, ग्रामसेवक के. डी. पवार, देवीदास सावळे, डी. आर. वाघ, नाना सुस्ते, तेजराव आमटे, भिकन तडवी, शिपाई अनिल तडवी, सुरेश सोन्ने ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Distribution of checks on behalf of Gram Panchayat