पर्यावरण जनजागृती प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे प्रमाणपत्र वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 14:34 IST
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळातर्फे पर्यावरण जनजागृती प्रश्नमंजुषा उपक्रमांतर्गत प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
पर्यावरण जनजागृती प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे प्रमाणपत्र वाटप
भुसावळ : निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळातर्फे पर्यावरण जनजागृती प्रश्नमंजुषा उपक्रमांतर्गत प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर वैद्य रघुनाथ सोनवणे, शिक्षण सभापती ॲड.तुषार पाटील, मंडळाचे जिल्हाध्यक्ष नाना पाटील, कार्याध्यक्ष डॉ.जगदीश पाटील यांची उपस्थित होते. प्रारंभी दीपप्रज्वलन व धन्वंतरी देवतेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविकात मंडळाचे जिल्हाध्यक्ष नाना पाटील यांनी मंडळाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. डॉ.जगदीश पाटील यांनी कोविड काळात पर्यावरण जनजागृती प्रश्नमंजुषा या उपक्रमाची संकल्पना मांडून त्याची निर्मिती केली. त्यात विद्यार्थी, शिक्षक, पालक, नागरिक, वकील, डॉक्टर, पत्रकार यांच्यासह सर्वच स्तरातील व्यक्तींनी सहभाग नोंदविला. त्यामुळे त्याला संपूर्ण महाराष्ट्रातून भरघोस प्रतिसाद मिळाल्याचेही नाना पाटील यांनी सांगितले. श्रुतिका जोशी, गौरी इखे, खुशबू तडवी, अक्षदा देवडा, संजय ताडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावरील ॲड.तुषार पाटील, वैद्य रघुनाथ सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. प्रश्नमंजुषा सोडवणारी पहिली विद्यार्थिनी भक्ती पाटील हिचे प्रमाणपत्र देऊन डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी कौतुक केले. संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे अडीच हजार व्यक्ती प्रश्नमंजूषेत सहभागी झाल्या होत्या. त्यापैकी प्रतिनिधिक स्वरुपात श्रुतिका जोशी, गौरी इखे, खुशबू तडवी, अक्षदा देवडा, सारंग सूर्यवंशी, प्रशांत पाटील, योग सूर्यवंशी, मनीषसिंग पाटील, योगेश पाटील, श्रीकांत जोशी, हबीब चव्हाण, उदय जोशी, तानिया लोकवाणी, युक्ती चोरडिया, सुरेंद्रसिंग पाटील, गौतम चोरडिया, विजय लुल्हे, शिशीर जावळे,आर.के.पाटील, मनीषा ताडेकर, एस. एस. अहिरे, प्रकाश जोशी, सौरभ जोशी, धीरज लोकवाणी, सोनाली देवडा, विवेक ठाकूर, भैय्या उर्फ सरफराज तडवी, निखील शिरसाट, विशाल सूर्यवंशी यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, विविध क्षेत्रातील मान्यवर, पालक यांचाही मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन डी. के. पाटील यांनी, तर आभार डॉ. जगदीश पाटील यांनी मानले.