आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ दप्तर वाटप, वृक्षरोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:18 IST2021-09-24T04:18:37+5:302021-09-24T04:18:37+5:30
वरखेडी, ता. पाचोरा : येथून जवळच असलेल्या साजगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वर्गीय जमुनाबाई पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दि. ...

आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ दप्तर वाटप, वृक्षरोपण
वरखेडी, ता. पाचोरा : येथून जवळच असलेल्या साजगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वर्गीय जमुनाबाई पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दि. १३ रोजी शाळेतील सर्व ४२ विद्यार्थ्यांना दप्तर व खाऊ वाटपाचा कार्यक्रम झाला.
यावेळी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अमरसिंग जुलाल पाटील, सरपंच समाधान सोनवणे, उपसरपंच उषाताई पाटील, पोलीसपाटील भगवान पवार, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष विशाल रामसिंग पाटील, माजी सरपंच रामभाऊ पाटील, ग्रामसेवक वासुदेव पाटील, मुख्याध्यापिका भावना सोनवणे होते.
यावेळी मुंबई येथे शिक्षक असलेले व या गावचे रहिवासी असलेले अमोल विजयसिंग पाटील यांनी आपल्या गावातील प्राथमिक शाळेतील सर्व ४२ चिमुकल्या विद्यार्थ्यांना आईच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत आपण आपल्या जन्मलेल्या गावाचे काहीतरी देणं लागतो, या उदात्त भावनेतून हे दप्तर वाटपाचे दातृत्व साधले.
यावेळी वृक्षारोपणदेखील करण्यात आले. प्रस्तावना अमोल पाटील यांनी मांडली, सूत्रसंचालन शिक्षक वासुदेव चव्हाण यांनी केले, तर आभार ह.भ.प. कल्पेश महाराज यांनी मानले.