५० लाखांच्या साहित्याचे आरोग्य यंत्रणेला वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 20:09 IST2020-06-23T20:08:04+5:302020-06-23T20:09:18+5:30

भुसावळ तालुक्यात कोरोनाने कहर केला आहे.

Distribution of 50 lakh materials to the health system | ५० लाखांच्या साहित्याचे आरोग्य यंत्रणेला वितरण

५० लाखांच्या साहित्याचे आरोग्य यंत्रणेला वितरण

ठळक मुद्देकोरोनासोबत लढण्यासाठी यंत्रणा झाली सज्जतालुक्यातील चारही केंद्र, पालिका रुग्णालय व इतर शासकीय रुग्णालयांमध्ये वितरण

भुसावळ : तालुक्यात कोरोनाने कहर केला आहे. याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या निधीतील ५० लाख रुपयांचे साहित्य खरेदी करण्यात आले आहे. सोमवारी किन्ही आरोग्य केंद्रातून चारही आरोग्य केंद्राला या साहित्याचे वितरण करण्यात आले. यामुळे कोरोनासोबतच दोन हात करण्यासाठी तालुक्यातील आरोग्य यंत्रणा आता सज्ज झाली आहे.
तालुक्यातील प्राथमिक, ग्रामीण, पालिका आरोग्य केंद्रासाठी आमदार संजय सावकारे यांच्या विशेष निधीतून ५० लाखांचे साहित्य खरेदी करण्यात आले आहे. किन्ही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून तालुक्यातील चारही आरोग्य केंद्रासाठी या साहित्याचे वितरण करण्यात आले. यासाठी आरोग्य विभागाला कोरोनाच्या लढ्यात आवश्यक असलेले पीपीई किट, एन ९५ मास्क, हँड सॅनिटायझर, सर्जिकल मास्क आदींसह अन्य औषधी, साहित्यांची वाटप केले. मुबलक प्रमाणात औषधांचा साठाही उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तालुक्यातील चारही केंद्र, पालिका रुग्णालय व इतर शासकीय रुग्णालयांमध्ये वितरण करण्यात आले.
यावेळी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटोळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे, तालुका वैघकीय अधिकारी डॉ.संगीता पांढरे, किन्ही केंद्राच्या डॉ.कल्पना दंवगे. डॉ.साजीया शेख, पिंपळगाव केंद्राचे औषध निर्माता मनोहर कोळी, किन्ही येथील माजी सरपंच अरुण चौधरी, सर्वोदय हायस्कूलचे चेअरमन सुरेश येवले, पंढरी बोंडे, दिलीप सुरवाडे, पोलीस पाटील राजू तायडे, संजय सुरवाडे, किरण घुले यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.
जिल्ह्यात भुसावळला प्राधान्य
जळगाव जिल्ह्यात सर्वप्रथम भुसावळ तालुक्यासाठी आमदार सावकारे यांनी शिफारस पत्र दिल्यामुळे या साहित्याची उपलब्धता लवकर झाली. जिल्ह्यात कोरोना निमुर्लनासाठी सर्वांत प्रथम भुसावळ तालुक्याला ही सामग्री मिळाली आहे, अशी माहिती यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटोळे यांनी दिली.
यंत्रणेचे बळकटीकरण
भुसावळ तालुक्यातील चारही आरोग्य केंद्रासाठी २० लाखांचे व दोन ग्रामीण आरोग्य केंद्रांसाठी २० लाख तर पालिकेच्या संत गाडगेबाबा रुग्णालयासाठी १० लाख असे एकूण ५० लाख रुपयांचे साहित्य खरेदी करण्यात आले आहे. यामुळे भुसावळ तालुक्यातील आरोग्य यंत्रणा बळकट होणार आहे.

Web Title: Distribution of 50 lakh materials to the health system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.