शेती वादातून पत्नीसह मुलास विहिरीत फेकले
By Admin | Updated: May 14, 2017 22:13 IST2017-05-14T22:12:57+5:302017-05-14T22:13:10+5:30
दोन वर्षीय गोळ्यासही विहिरीत टाकल्याची घटना तालुक्यातील मुंजलवाडी येथे शनिवारी घडली़ रविवारी पोलिसांनी दिवसभर केलेल्या चौकशीनंतर घटनेचा उलगडा झाला़

शेती वादातून पत्नीसह मुलास विहिरीत फेकले
ऑनलाइन लोकमत
रावेर, दि. 14 - शेतीच्या वादातून टोकाचे भांडण झालेल्या पतीने आपल्या पत्नीचा गळा आवळून तिला विहिरीत फेकल्यानंतर पोटच्या दोन वर्षीय गोळ्यासही विहिरीत टाकल्याची घटना तालुक्यातील मुंजलवाडी येथे शनिवारी घडली़ रविवारी पोलिसांनी दिवसभर केलेल्या चौकशीनंतर घटनेचा उलगडा झाला़
संशयीत आरोपी तथा पती चंदन हरी राजळे (वय ३५) यास अटक करण्यात आली आहे़ आरोपी पतीचे आपली पत्नी तुळाबाई चंदन राजळे हिच्याशी शनिवारी रात्री टोकाचे भांडण झाले़ पत्नीच्या नावावर असलेल्या शेतामुळेच वाद टोकाला गेला तर त्यानंतर त्याने पत्नीचा गळा आवळून ती मृत झाल्याची खात्री करीत विहिरीत मृतदेह फेकला़ त्यानंतर संतापाच्या भरात पोटच्या गोळ्यास ईश्वर (वय २) यासही चक्क जिवंतपणे विहिरीत फेकले़ या घटनेत मुलाचाही मृत्यू झाला़
दरम्यान, घटनेनंतर संशयीत आरोपी पतीने बेशुद्ध झाल्याचा बनाव केला होता मात्र रविवारी दिवसभरात पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली़