शाळेतून घरी परतणाऱ्या बलिकेचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 20:42 IST2019-09-20T20:42:19+5:302019-09-20T20:42:33+5:30
नाडगाव येथील प्रकार : वडिलांनाही मारहाण

शाळेतून घरी परतणाऱ्या बलिकेचा विनयभंग
बोदवड : तालुक्यातील नाडगाव येथील शाळेत शिक्षण घेत असलेली इयत्ता नववीतील बालिका शाळा सुटल्यानंतर नाडगाव येथे घरी जात असताना बोदवड रेल्वेगेट जवळ नाडगाव येथीलच शासकीय ओद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेला विशाल अर्जुन माळी रा. येवती याने विनयभंग केला. पोलीस स्टेशनला हे प्रकरण आले असताना जाब विचाणाºया मुलीच्य वडिलांना आरोपीच्या मित्रांनी धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकारही घडला.
या संदर्भात प्राप्त माहिती अशी की, नाडगाव येथील अल्पवयीन युवती नेहमी प्रमाणे सकाळी शाळेत गेली होती. दुपारी १२ वाजेच्या सुमारास ती शाळेकडून घराकडे परतत असताना विशाल माळी याने तिला अडवून मी तुझ्यावर प्रेम करतो, असे म्हणत तु माझ्यावर प्रेम कर नाहीतर अॅसिड टाकून तुला जाळून टाकेल असे धमकावले. भेदरलेल्या स्थितीत या मुलीने घराकडे धाव घेतली व झालेला प्रकार पालकांना सांगितला. तिच्या पालकांनी ताबडतोब पोलीस स्टेशन गाठून तक्रार केली. पोलिसांनी या मुलाला पकडून पोलीस स्टेशनला आणले असता त्याच्या बरोबर त्याचे तीन मित्रही आले. मुलीचे पालक आरोपीस जाब विचारत असताना त्याच्या मित्रांनी त्यांना धक्काबुक्की व मारहाण केली.
याप्रकरणी मुलीच्या फियार्दी वरून आरोपी तरुण व त्याच्या मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे,पुढील तपास उपनिरीक्षक मालचे करीत आहेत.