ब्राम्हण सभेची वार्षिक सभेत विविध विषयांवर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:53 IST2021-02-05T05:53:50+5:302021-02-05T05:53:50+5:30

जळगाव : ब्राह्मण सभेची ९७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गंधे समागृहात झाली. यावेळी सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने सभेला सुरुवात ...

Discussion on various topics in the annual meeting of Brahman Sabha | ब्राम्हण सभेची वार्षिक सभेत विविध विषयांवर चर्चा

ब्राम्हण सभेची वार्षिक सभेत विविध विषयांवर चर्चा

जळगाव : ब्राह्मण सभेची ९७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गंधे समागृहात झाली. यावेळी सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने सभेला सुरुवात करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी ॲड. सुशील अत्रे होते. उपाध्यक्ष नितीन कुलकर्णी, कोषाध्यक्ष अमोल जोशी व सुजय जोगळेकर आदी उपस्थित होते.

कार्यालयीन चिटणीस संजय जोशी यांनी मागील वार्षिक सभा इतिवृत्ताचे वाचन केले. तसेच मागील आर्थिक वर्षातील हिशेब पत्रक सादर केले. त्यांना मंजुरी देण्यात आली. केळीच्या फुलापासून सूप तयार करून त्याचे सेवन केल्यास शरीरास अत्यंत उपयुक्त असल्याबद्दलचे संशोधन करून त्याचे पेंटंट मिळविल्याबद्दल डॉ. तेजोमयी भालेराव यांचा सत्कार ब्राह्मण सभेतर्फे करण्यात आला तसेच क्रांतिकारकांच्या जीवनावर लेखन केलेले इतिहासाच्या पाऊलखुणा भाग-३ या इतिहास संदर्भग्रंथात सहलिखाण केलेले दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरील स्वामी विवेकानंदावरील कार्यक्रमाचे सहलेखन व प्रत्यक्ष सहभागी असणारे शुभंकर सुशील अत्रे यांचाही सत्कार ब्राह्मण सभेतर्फे करण्यात आला.

Web Title: Discussion on various topics in the annual meeting of Brahman Sabha