गौण खनिजप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:19 IST2021-09-23T04:19:51+5:302021-09-23T04:19:51+5:30
गेल्या आठवड्यात झालेल्या जलसिंचन सभेत पुन्हा गौण खनिजाचा मुद्दा गाजल्यानंतर, पुढील आठवड्यात पंचायत राज समिती येण्यापूर्वी गौण खनिज प्रकरणातील ...

गौण खनिजप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा
गेल्या आठवड्यात झालेल्या जलसिंचन सभेत पुन्हा गौण खनिजाचा मुद्दा गाजल्यानंतर, पुढील आठवड्यात पंचायत राज समिती येण्यापूर्वी गौण खनिज प्रकरणातील दोषींवर कारवाईची तयारी प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे तक्रारदार पल्लवी सावकारे यांच्याकडून सतत पाठपुरावा सुरू असल्यामुळे पंकज आशिया यांनी नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन, या गैरव्यवहारातील कारवाईप्रकरणी चर्चा केली आहे. परंतु, या चर्चेतून प्रशासनाची कारवाईची भूमिका काय ठरली, याबाबत आशिया यांनी कुठलीही माहिती दिली नाही. मात्र, या गैरव्यवहारप्रकरणी संबंधितांकडून अहवाल प्राप्त झाला आहे तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चाही झाली असून, येत्या दोन दिवसात प्रशासनाकडून कारवाईचा निर्णय घेणार असल्याचे आशिया यांनी सांगितले.
ईन्फो :
कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
पंचायत राज समिती २७ सप्टेंबरपासून जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांना व विभागप्रमुखांना मुख्यालयी राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच महत्त्वाच्या कामांबाबत कर्मचाऱ्यांना सुट्टीच्या दिवशीही कामावर बोलावून, काम पूर्ण करण्याच्या सूचना केल्या असल्याचे आशिया यांनी सांगितले.