आव्हाणे परिसरात 12 तास वीज पुरवठा खंडीत

By Admin | Updated: June 11, 2017 16:54 IST2017-06-11T16:54:56+5:302017-06-11T16:54:56+5:30

पावसामुळे आव्हाणे गावात 12 तास तर शिरसोली गावात तब्बल आठ तास वीज पुरवठा खंडीत होता.

Disconnect 12 hours of power supply in the field | आव्हाणे परिसरात 12 तास वीज पुरवठा खंडीत

आव्हाणे परिसरात 12 तास वीज पुरवठा खंडीत

>ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.11  - तालुक्यातील आव्हाणे, शिरसोली, खेडी, वडनगरी व फुपनगरी या गावांमध्ये देखील शनिवारी रात्री जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे परिसरातील अनेक शेतांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. पावसामुळे आव्हाणे गावात 12 तास तर शिरसोली गावात तब्बल आठ तास वीज पुरवठा खंडीत होता. 
 शनिवारी 12.30 वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. पहाटे 3 वाजेर्पयत पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र या पावसामुळे महावितरणचा भोंगळ कारभार दिसून आला. पावसाळ्याचा तोंडावर कोणतीही दुरुस्ती न केल्याने आव्हाणे जाणा:या काही विजेचे खांब पडले होते. यामुळे आव्हाणे गावाचा 12 तास वीज पुरवठा खंडीत झाला होता. हीच स्थिती खेडी, वडनगरी व फुपनगरी, शिरसोली या गावांमध्येही पहायला मिळाली. 

Web Title: Disconnect 12 hours of power supply in the field