रेन वॉटर हाव्रेस्टींग प्रकल्प राज्यासाठी दिशादर्शक-गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 16:27 IST2017-08-26T16:25:20+5:302017-08-26T16:27:40+5:30

सावदा येथे हाजी शब्बीर हुसेन यांनी स्वखर्चातून उभा केला ‘रेन वॉटर हाव्रेस्टिंग सिस्टीम प्रकल्प

Directorate of Rain Water Harvesting Project- Girish Mahajan | रेन वॉटर हाव्रेस्टींग प्रकल्प राज्यासाठी दिशादर्शक-गिरीश महाजन

रेन वॉटर हाव्रेस्टींग प्रकल्प राज्यासाठी दिशादर्शक-गिरीश महाजन

ऑनलाईन लोकमत
सावदा, जि.जळगाव, दि.26 - सावदा येथील हाजी शब्बीर हुसेन( बाबुशेठ) यांनी स्व:खर्चातून उभारलेल्या ‘रेन वॉटर  हाव्रेस्टिंग सिस्टीम हा प्रकल्प राज्यासाठी दिशादर्शक असल्याचे जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले. 
रावेर येथील कार्यक्रमाला जाताना शनिवारी त्यांनी प्रकल्पाला भेट दिली. त्यांच्या सोबत आमदार हरीभाऊ जावळे,  हाजी शब्बीर हुसेन, माजी खासदार डॉ. गुणवंतराव सरोदे, नगरसेवक राजेंद्र चौधरी, जि.प.उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन,श्रीकांत महाजन  होते.
दरम्यान, येथे दोन दिवसांपासून सुरु असलेल्या  पावसाचे लाखो लीटर पाणी विहिरीत सोडण्यात आले. एक थेंब पानी सुद्धा शिल्लक राहिले नाही, अशी माहिती बाबूशेठ यांनी दिली. 

Web Title: Directorate of Rain Water Harvesting Project- Girish Mahajan