शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

पिंप्राळ्यातील जीर्ण रथ पंचमहाभूतांना समर्पित

By अमित महाबळ | Updated: September 27, 2022 15:31 IST

जळगाव शहराचा भाग असलेले पिंप्राळा हे पूर्वी स्वतंत्र गाव होते. त्याची स्वत:ची ग्रामपंचायत होती. गावाच्या शेवटच्या भागात पुरातन विठ्ठल मंदिर आहे. मंदिर दोन मजली असून, बांधकाम लाकडात केलेले आहे.

जळगाव : पिंप्राळा येथील श्री विठ्ठल मंदिर संस्थानचा जीर्ण झालेला रथ मंगळवारी, पंचमहाभूतांना समर्पित करण्यात आला. त्याचे अग्निमध्ये विधिवत हवन करण्यात आले. जानकीबाई यांचे माहेर असलेल्या गांधी चौकात हा सोहळा सर्वांच्या साक्षीने पार पडला.

जळगाव शहराचा भाग असलेले पिंप्राळा हे पूर्वी स्वतंत्र गाव होते. त्याची स्वत:ची ग्रामपंचायत होती. गावाच्या शेवटच्या भागात पुरातन विठ्ठल मंदिर आहे. मंदिर दोन मजली असून, बांधकाम लाकडात केलेले आहे. विठ्ठल, राही व रुक्मिणीच्या मूर्ती असलेले हे राज्यातील एकमेव मंदिर असल्याचे म्हटले जाते. श्री विठ्ठल मंदिर संस्थान, वाणी पंच मंडळ आणि समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने दरवर्षी आषाढी एकादशीला रथोत्सव साजरा केला जातो. त्याचे यंदा १४७ वे वर्ष होते. 

या रथोत्सवासाठी तोताराम नत्थूशेठ वाणी यांनी कन्या जानकाबाई हिच्या स्मरणार्थ मोठा रथ श्री विठ्ठल मंदिर संस्थानला अर्पण केला होता. बरीच वर्षे तो वापरला गेला. त्यानंतर २००१ मध्ये नवीन तयार केलेला रथ उत्सवासाठी वापरला जाऊ लागला. नवीन रथासाठी स्वतंत्र घर बांधले आहे, त्या शेजारीच आधीचा रथ ठेवलेला होता.

यांच्या बैठकीत निर्णयजीर्ण झालेल्या रथाचे काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला होता. या संदर्भात वाणी समाज बांधव, श्री विठ्ठल मंदिराचे पुजारी, कार्यकारिणी सदस्य, समस्त पांडुरंग भजनी मंडळ, सत्संग मंडळ, शांतता कमिटी सदस्य, नगरसेवक, ग्रामस्थ यांची बैठक झाली. श्री विठ्ठल मंदिर संस्थानचे अध्यक्ष मोहनदास वाणी यांनी जुन्या रथाचे विसर्जन करण्याचा प्रस्ताव मांडला. रथोत्सव समितीचे प्रमुख अनिल वाणी यांनी जीर्ण झालेल्या रथाची पार्श्वभूमी सभेत मांडली. त्यानंतर हा रथ पंचमहाभूतांना समर्पित करण्याचे ठरले.

असा झाला विधीजीर्ण झालेल्या रथाची अनिल व आरती वाणी, किशोर व जयश्री वाणी, संजय व सुवर्णा वाणी, पुरुषोत्तम व शांताबाई सोमाणी, जितेंद्र व गौरी पाटील या जोडप्यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. पौराहित्य मनोज कुलकर्णी, अतुल कुलकर्णी, सारंग कुलकर्णी यांनी केले. त्यानंतर जीर्ण रथ अग्निला समर्पित करण्यात आला. कार्यक्रमाला वाणी मंच मंडळाचे अध्यक्ष मोहनदास वाणी, उपाध्यक्ष सुनील वाणी, चिटणीस योगेश वाणी, सहसिचटणीस नंदकिशोर वाणी, सदस्य रुपेश वाणी, अक्षय वाणी, कल्पेश वाणी, प्रवीण वाणी, संजय वाणी व ग्रामस्थ उपस्थित होते.

तापी नदीत होणार रक्षा विसर्जनरथाच्या रक्षेची भजनी मंडळासमवेत रविवारी, गाव प्रदक्षिणा केली जाणार आहे. सुरुवात गांधी चौकापासून, तर समारोप सोमाणी मार्केट चौकात होईल. त्यानंतर रक्षेचे विसर्जन तापी नदीत (मुक्ताईनगर) केले जाणार आहे. जीर्ण झालेल्या रथावरील ताम्रपट हा नवीन रथाला लावण्यात येणार आहे. 

टॅग्स :Jalgaonजळगाव