विजेच्या लंपडावाने आनंदावर विरजण
By Admin | Updated: September 21, 2015 00:51 IST2015-09-21T00:51:09+5:302015-09-21T00:51:09+5:30
विजेच्या लंपडावाने आनंदावर विरजण ऐन आरतीच्यावेळी वीजपुरवठा खंडित : रविवारच्या सुट्टीमुळे आरास पाहण्यासाठी भक्तांची प्रचंड गर्दी

विजेच्या लंपडावाने आनंदावर विरजण
जळगाव : गणेशोत्सवाच्या काळात शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत ठेवा, असे स्पष्ट आदेश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी दिले आहेत, असे असताना गेल्या तीन दिवसांपासून शहरात सायंकाळी ऐन आरतीच्या वेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने गणेश मंडळाचे कार्यकर्ते त्रस्त झाले आहेत. याबाबत महावितरणकडे तक्रार करुनही दखल घेतली जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, रविवारच्या सुटीमुळे आज आरास पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. ऐन गर्दीच्यावेळी वीजपुरवठा खंडित झाल्याने चेंगराचेंगरी होण्याची भीती असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, तत्पूर्वीच जिल्हाधिका:यांची दखल घ्यावी अशी मागणी मंडळांनी केली आहे. नवीपेठेत पाच तास वीज गुल गणेशोत्सव सुरू असताना रात्रीच्या वेळी फिडरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर शहरातील जुने जळगाव, सराफ बाजार, दाणा बाजार, महाबळ कॉलनी, त्र्यंबक नगर, शिव कॉलनी व गणेश कॉलनीच्या काही भागात गेल्या तीन दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. रविवारीही सकाळी साडेनऊ ते दुपारी अडीचर्पयत नवीपेठ भागात वीजपुरवठा खंडित झाल्याने मंडळाच्या कार्यकत्र्यानी तीव्र संताप व्यक्त केला. सोमवारी महावितरणवर धडक जिल्हापेठ भागात शनिवारी रात्री वीजपुरवठा खंडित झाल्याने मंडळाच्या कार्यकत्र्यानी महावितरण कार्यालयात तीव्र संताप व्यक्त केला होता. त्यानंतरही रविवारी विजेचा लपंडाव सुरुच होता. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी सोमवारी सकाळी 11 वाजता महावितरणच्या अधिका:यांची औद्योगिक वसाहत कार्यालयात भेट घेऊन व्यथा मांडणार आहेत. आरास पाहण्यासाठी गर्दी विविध गणेश मंडळाच्या कार्यकत्र्यानी नवीपेठ, जिल्हापेठ व रेल्वे स्टेशन रोडवर अमरनाथ, शिर्डीचे साईबाबा, वैष्णवी देवी, आयोध्यातील श्रीराम मंदिरचा देखावा साकारला आहे. तो पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. बुधवार, गुरुवार व शुक्रवारी पाऊस असल्याने भाविकांचा हिरमोड झाला होता. सायंकाळी सहा वाजेपासून गर्दी रविवारी सुट्टीचे औचित्य साधत सायंकाळी सहा वाजेपासूनच भाविकांची आरास पाहण्यासाठी नवी पेठ, नेहरू चौक, मित्र मंडळ, बळीराम पेठ, शनी पेठ, बालजी पेठ व गणेश कॉलनी भागात गर्दी केली होती. ती रात्री 11 वाजेर्पयत कायम होती. गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर नवी पेठ परिसर व गोलाणी मार्केटच्या परिसरात विक्रेत्यांनी विविध वस्तूंची विक्री करण्यासाठी दुकाने थाटलेली होती. आरास पाहिल्यानंतर भाविक दुकानांवरील वस्तू खरेदी करीत होते. तसेच प्रत्येक गणेश मंडळाजवळ छोटे पाळणे लावण्यात आल्यामुळे बच्चे कंपनीने पाळण्यात बसून मनमुराद आनंद लुटला. टॉवर चौक, नेहरू चौक तसेच छत्रपती शिवाजी पुतळा, विसनजी नगर या भागात वाहतुकीची कोंडी होऊ नये, म्हणून सायंकाळी सहा वाजेनंतर नागरिकांना वाहने आणण्यास वाहतूक पोलीस नकार देत होते. प्रत्येक चौकात बॅरीकेट्स लावण्यात आले आहेत.