रेल्वेच्या प्रवासातील अडचणी होणार दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:11 IST2021-07-23T04:11:36+5:302021-07-23T04:11:36+5:30

भुसावळ : बऱ्याचदा आपल्या मार्गावर अनेक गाड्या धावत असतात, याची आपल्याला माहिती नसते. अशा परिस्थितीत ट्रेनमध्ये रिक्त ...

The difficulties of train travel will be removed | रेल्वेच्या प्रवासातील अडचणी होणार दूर

रेल्वेच्या प्रवासातील अडचणी होणार दूर

भुसावळ : बऱ्याचदा आपल्या मार्गावर अनेक गाड्या धावत असतात, याची आपल्याला माहिती नसते. अशा परिस्थितीत ट्रेनमध्ये रिक्त बर्थ असूनही माहिती नसते. मात्र, आता ही माहिती तुमच्या मोबाइलवरही उपलब्ध असेल, याबाबतची सेवा रेल्वे देत आहे.

यासेवेत आपल्या मोबाइलवर उपयुक्त मेसेज येथील आयआरसीटीसीकडून पुश नोटिफिकेशन सेवा सुरू होणार आहे. यासाठी आयआरसीटीसीने मे महिन्यातच ‘मेसर्स मोमॅजिक टेक्नॉलॉजीज’ कंपनीशी करार केलाय. या सेवेद्वारे आपल्या मोबाइलवर मेसेज पाठवून नवीन गाड्यांची माहिती दिली जाईल. ट्रेनमध्ये बर्थची उपलब्धता आणि प्रतीक्षा तिकिटांची पुष्टी होण्याची शक्यता मोबाइलवरच संदेशाद्वारे अद्ययावत केली जाईल. इतकेच नाही तर आयआरसीटीसीशी संबंधित अनेक प्रकारची माहिती तुम्हाला दिली जाईल. इन्स्टंट मोबाइलवर एअर तिकीट आणि हॉटेल बुकिंगची माहितीदेखील उपलब्ध असेल. आपणास देश-विदेशातील धार्मिक आणि पर्यटनस्थळांना भेट द्यायची असेल या माहितीसह टूर पॅकेजविषयीचीही माहिती आपल्या मोबाइलवरही उपलब्ध असेल.

पुश सूचना एक पॉप-अप संदेश आहे, जेव्हा आपण त्यावर क्लिक कराल तेव्हा माहिती फ्लॅश होईल. हे आपल्या मोबाइलवर सूचनेसारखे येते आणि त्यावर क्लिक केल्यावर संबंधित माहिती मोबाइलच्या ब्राउझरवर दिसते. ग्राहक या खास सेवेची सदस्यता विनामूल्य घेऊ शकतात. यासाठी त्यांना आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी लागेल आणि या सेवेची सदस्यता घ्यावी लागेल. लवकरच या सेवेसाठी नोंदणी आयआरसीटीसी वेबसाइटवर सुरू होईल, असे सांगण्यात येत आहे. आपल्याला फक्त आपला मोबाइल नंबर आणि तपशील प्रविष्ट करून नोंदणी करावी लागेल. सूचना आपल्या मोबाइलवर येऊ लागतील. या सेवेच्या माध्यमातून ट्रेनमध्ये तिकीट, कॅटरिंग सेवा, पर्यटन इत्यादी संबंधित माहिती लवकर प्रसारित केली जाईल.

Web Title: The difficulties of train travel will be removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.