शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

यावल तालुक्यातील किनगाव व नायगाव येथे अतिसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 12:22 IST

१० रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार

ठळक मुद्देगावात २२ पथकेरुग्णांची संख्या पोहचली ६१

जळगाव : यावल तालुक्यातील किनगाव खुर्द व किनगाव बुद्रुक येथील अतिसाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. मंगळवारी पुन्हा पाच नवीन रुग्ण दाखल झाले असून त्यांच्यासह एकूण १० रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये नायगाव येथील रुग्णांचाही समावेश असून रुग्ण संख्या ६१वर पोहचली आहे. दरम्यान, गावात २२ पथके तैनात आहेत.किनगाव येथे अतिसाराची लागण झाल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून रुग्णांवर किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात येत आहे. गावात ९ रोजी ३२ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर १० रोजी २२ व ११ रोजी पुन्हा सात रुग्ण जणांना अतिसाराचा त्रास झाला. यातील २८ जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामध्ये ११ रोजी पंकज शिवाजी साळुंखे (२६), आरिफ खान सलीम (१८),सिकंदर जबरा तडवी (७५) सर्व रा. किनगाव, समशाद गुलशेर तडवी (४५), आरती गौतम कंगरे (४०) रा. नायगाव या पाच जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सोबतच या पूर्वी दाखल झालेल्या नयूम लतिफ तडवी (१६), राबिया शेख सुपडू (१३), चेतन शरद पाटील (३१), हजराबी निसार खाटीक (६५), रा. किनगाव, सलीम सायबू तडवी (४५), रा. नायगाव यांच्यावरही जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.जिल्हा रुग्णलायात पाहणीजिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णांची मंगळवारी संध्याकाळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी विचारपूस करून रुग्णालयात पाहणी केली. तसेच कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.गावात पथक तळ ठोकूनसध्या दोन्ही गावांमध्ये तीन वैद्यकीय अधिकाºयांसह प्रत्येकी तीन जणांचा समावेश असलेले २२ पथके तैनात असून किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कॅम्प लावण्यात आले आहेत. तेथे रुग्णांवर प्राथमिक उपचार करून त्यांना जिल्हा रुग्णालयात हलिवण्यात येत आहे. याच ठिकाणी चार रुग्णवाहिकादेखील हजर आहे.साथ नियंत्रणातगावात पसरलेली साथ नियंत्रणात असल्याची माहिती डॉ. कमलापूरकर यांनी दिली. अद्यापही थोडेफार रुग्ण आढळून येत असले तरी तेथे तैनात पथक तातडीने उपचार करीत असल्याचे त्यांनी सांगितले.बुधवारी येणार अहवालप्राथमिक अंदाजानुसार दुषीत पाण्यामुळे ही साथ पसरली असल्याचा अंदाज असून गावातील नमुने तपासणीसाठी पाठविले असून त्याचा अहवाल बुधवारी येणार असल्याचेडॉ.कमलापूरयांनीसांगितले.किनगाव येथे दुषीत पाण्यामुळे ही साथ असल्याचा अंदाज असल्याने गावातील पाणीपुरवठ्याच्या जलवाहिनींच्या गळतीचे काम हाती घेण्यात आले असून त्यास वेग आला असल्याचे डॉ. कमलापूरकर यांनी सांगितले.किनगाव येथील साथ नियंत्रणात असून अद्यापही कोणाला त्रास झाल्यास त्यांनी तत्काळ तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा जिल्हा रुग्णालयात यावे. याबाबत कोणीही घाबरून न जाता दक्षता घ्यावी. तसेच खाजगी डॉक्टरांनीही सहकार्य करावे.- डॉ. बबिता कमलापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव