शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत धुळ्याचा धर्मेश हिरे प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 4:57 PM

शेठ ना.बं.वाचनालयातर्फे आयोजित स्व.प्रा.मंदा व डॉ.श्यामकांत देव स्मृती आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत धुळे येथील विद्यावर्धिनी सभा संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी कल्पेश साहेबराव हिरे हा विद्यार्थी सर्वप्रथम आला.

चाळीसगाव, जि.जळगाव : येथील शेठ ना.बं.वाचनालयातर्फे आयोजित स्व.प्रा.मंदा व डॉ.श्यामकांत देव स्मृती आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत धुळे येथील विद्यावर्धिनी सभा संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी कल्पेश साहेबराव हिरे हा विद्यार्थी सर्वप्रथम आला.स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी १० वाजता दीपप्रज्वलनाने झाले. वाचनालयाच्या अध्यक्षा डॉ.हेमांगी पूर्णपात्रे, उपाध्यक्ष प्रीतमदास रावलानी, कार्यवाह प्रा.दीपक शुक्ल, समितीचे निमंत्रक राजेंद्र चिमणपुरे, परीक्षक विश्वास पाडुळसे, डॉ..वैशाली गालापुरे , स्मिता वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले. परीक्षकांचा परिचय संचालक विश्वास देशपांडे यांनी करून दिला तर सकाळच्या सत्राचे सूत्रसंचालन संचालक मधुकर कासार यांनी केले.दिवसभर चाललेल्या या स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण समारंभासाठी माजी उपप्राचार्य प्रा.व्ही.डी जोशी उपस्थित होते. सुरवातीला राजेंद्र चिमणपुरे यांनी प्रास्ताविकात स्पर्धेचा उद्देश व वाचनालयाची माहिती दिली. यावेळी परीक्षक राजेंद्र पाडुळसे यांनी स्पर्धेविषयी मनोगत व्यक्त केले. स्पर्धकातील उणिवा, त्यांचे गुण-दोष इत्यादींबाबत मार्गदर्शन केले. वाचनालयाच्या अध्यक्ष डॉ.हेमांगी पूर्णपात्रे यांनी पी.डी.दलाल व सुजता अवचट यांचे व सर्व स्पर्धकांचे आभार मानले. प्रमुख पाहुणे प्रा.व्ही.डी.जोशी यांनी विद्यार्थ्यांना रामायण, महाभारत व दासबोधातील अनेक दाखले देत वक्तृत्व कला कशी संपन्न होते याविषयी मार्गदर्शन केले. यात कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धुळ्याचा विद्यार्थी कल्पेश हिरे यास प्रथम पारितोषिक रुपये अडीच हजार व चषक प्रदान करण्यात आला. दुसरे पारितोषिक नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी राजश्री जयंत कुलकर्णी हिस रुपये १७००, तृतीय पारितोषिक झुलाल भिलाजीराव पाटील महाविद्यालयाचा विद्यार्थी सागर शितोळे यास रुपये १४०० तर कु प्राजक्ता पिंगळे, महेश आहिरे, वरुण घरटे, सृष्टी अहिरे, दीपाली सपकाळ, कल्पेश माळी यांनी उत्तेजनार्थ प्रत्येकी रुपये ३०० रुपयांची पारितोषिके देण्यात आली. या स्पर्धेत जळगाव, धुळे, नंदुरबार, व नाशिक जिल्ह्यातील सुमारे २७ विद्यार्थांनी भाग घेतला.राजेश ठोंबरे यांनी प्रमुख अतिथी प्रा.व्ही.डी.जोशी, प्रयोजिका सुजाता अवचट यांचा परिचय करून दिला. स्पर्धेनंतर वाचनालयाच्या आवारात संचालक वसंतराव चंद्रात्रे, प्रा.ल.वि.पाठक आदी मान्यवरांंच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

टॅग्स :collegeमहाविद्यालयChalisgaonचाळीसगाव