धुळे मनपाचा देशात नववा, तर राज्यात दुसरा क्रमांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:29 IST2020-12-03T04:29:05+5:302020-12-03T04:29:05+5:30
या कालावधीत कचरा विलगीकरण, कचऱ्यावर योग्य प्रक्रिया करणे, ओल्या व सुका कचऱ्यावर प्रक्रिया, मार्केट परिसरातील स्वच्छता राहण्यासाठी १०० मीटर ...

धुळे मनपाचा देशात नववा, तर राज्यात दुसरा क्रमांक
या कालावधीत कचरा विलगीकरण, कचऱ्यावर योग्य प्रक्रिया करणे, ओल्या व सुका कचऱ्यावर प्रक्रिया, मार्केट परिसरातील स्वच्छता राहण्यासाठी १०० मीटर अंतरावर प्लॅस्टिक कचराकुंड्यांची व्यवस्था तसेच दिवसातून दोन वेळा स्वच्छता, उघड्यावर कचरा फेकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह प्लॅस्टिकबंदीची कडक कारवाई केली जात आहे. धुळे महानगर हगणदारीमुक्तसाठी मनपाकडून शहरातील विविध ठिकाणी १३९ सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली आहेत. स्वच्छतागृहाची नियमित स्वच्छता, फवारणी व आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सर्व बाबींचा विचार करून गतवर्षी झालेल्या स्पर्धेत मनपाला चांगले मानांकन मिळाले आहे, अशी माहिती मनपाचे सहायक आरोग्य अधिकारी चंद्रकांत जाधव यांनी दिली.