जळगाव मनपा समोर धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 13:34 IST2017-08-10T13:33:43+5:302017-08-10T13:34:01+5:30
विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय सफाई मजदूर कॉँग्रेसतर्फे धरणे आंदोलन

जळगाव मनपा समोर धरणे आंदोलन
ठळक मुद्देसफाई कामगारांना सहाव्या वेतन आयोगाचा फरक त्वरित देण्यात यावा यासह विविध मागण्यामजदूर कॉँग्रेसच्या आदेशानुसार आयोजित
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 10 - सफाई कामगारांना सहाव्या वेतन आयोगाचा फरक त्वरित देण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय सफाई मजदूर कॉँग्रेसतर्फे मनपा समोर बुधवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
मजदूर कॉँग्रेसच्या आदेशानुसार आयोजित या धरणे आंदोलनात प्रदेश अध्यक्ष अरूण चांगरे, महामंत्री जयप्रकाश चांगरे, प्रदेश सचिव जितेंद्र चांगरे, शहर अध्यक्ष अमरसिंग रानवे, जिल्हाध्यक्ष दिलीप चांगरे, उपाध्यक्ष अजय चांगरे, जिल्हा सचिव संजय सनकत याच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी निदर्शनेही केली.