धरणगाव तालुक्यातील ६० वि.का.सो.मध्ये ठरावासाठी चुरस
By Admin | Updated: February 19, 2015 13:14 IST2015-02-18T23:53:53+5:302015-02-19T13:14:41+5:30
तालुक्यात एकूण ६० विविध कार्यकारी सोसायट्या असून जिल्हा बँकेच्या निवडणुकांची उमेदवारी व मतदान करण्यासाठी होणार्या ठरावासाठी चुरस वाढली आहे.

धरणगाव तालुक्यातील ६० वि.का.सो.मध्ये ठरावासाठी चुरस
मातब्बर उमेदवारीच्या रिंगणात राहण्याची शक्यता
जिल्हा बँक निवडणूक
धरणगाव : तालुक्यात एकूण ६० विविध कार्यकारी सोसायट्या असून जिल्हा बँकेच्या निवडणुकांची उमेदवारी व मतदान करण्यासाठी होणार्या ठरावासाठी चुरस वाढली आहे. वि.का. सोसायटी मतदार संघात विद्यमान संचालकांसह इतर मातब्बर उमेदवारी दाखल करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तालुक्यात एकूण साठ वि.का. सोसायट्या आहेत. त्यापैकी अनेक सोसायट्यांच्या निवडणुका झाल्या. त्यामुळे पूर्वी झालेल्या ठराव अडचणीत आले आहेत. तर नवीन ठराव त्या सोसायट्यांचे होण्याची शक्यता आह.
तालुक्यातील शिवसेनेचे विद्यमान आमदार गुलाबराव पाटील यांचा पाळधी बु.।। वि.का.मधून ठराव झाला आहे. तसेच विद्यमान संचालिका सोनल संजय पवार (चांदसर वि.का.सो.), माजी संचालक संजय मुरलीधर पवार (उखळवाडी वि.का.सो.), वैशाली पंढरीनाथ पाटील (वाघळूद-हनुमंतखेडा वि.का.सो.) ठराव झाले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात तालुक्यातून मातब्बरांची लढाई निश्चित आहे. त्याचप्रमाणे जिल्हा बँकेच्या महिला राखीव मतदारसंघातून इंटक जिल्हाध्यक्ष डी.जी. पाटील यांच्या धर्मपत्नी अरुणा दिलीप पाटील या विद्यमान संचालिका निवडणूक लढविणार आहेत. तसेच ओबीसी मतदारसंघातून (पुरुष) व माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन हेही इच्छुक आहेत.