धरणगाव तालुका प्रवासी मंडळाने केला गुणवंतांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:19 IST2021-09-14T04:19:03+5:302021-09-14T04:19:03+5:30
धरणगाव : तालुका प्रवासी मंडळाच्या वतीने तालुक्यातील इयत्ता दहावी व बारावीला प्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार येथील व्यंकटेश नागरी ...

धरणगाव तालुका प्रवासी मंडळाने केला गुणवंतांचा सत्कार
धरणगाव : तालुका प्रवासी मंडळाच्या वतीने तालुक्यातील इयत्ता दहावी व बारावीला प्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार येथील व्यंकटेश नागरी पतसंस्थेच्या सभागृहात केला गेला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पतसंस्थेचे चेअरमन प्रशांत केले उपस्थित होते. यावेळी प्रवासी मंडळाचे अध्यक्ष महेंद्र कोठारी, उपाध्यक्ष रवींद्र भागवत, सचिव एस. डब्ल्यू. पाटील, डॉ. मिलिंद डहाळे, नगरसेवक ललित येवले, हभप आर. डी. महाजन, प्रा. कविता महाजन, उर्दू शाळेचे शिक्षक शहानवाज शेख उपस्थित होते.
या कार्यक्रमात पूजा पाटील, दिव्या चव्हाण, साक्षी काटवे, इफरा अंजुमन काझी, कौस्तुभ भावसार, भूमिका पटेल, पौर्णिमा भागवत, स्वप्नील विसावे, तेजल पाटील, रिद्धी भाटिया, सुनीता कोळी, रिझवनवी शेख, ऋतुजा पितृभक्त, वेदांत केले यांचा सत्कार झाला. देवश्री महाजन हिचा दहावीत ९७.२० टक्के मिळवल्याने व इंग्रजीत ५० कविता लिहिल्याने विशेष सत्कार झाला. ऋतुजा पितृभक्त या विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त करून मंडळाचे आभार मानले.
हभप आर. डी. महाजन यांनी व्यासपीठावरील सगळ्यांच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. सचिव एस. डब्ल्यू. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र भागवत यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रवासी मंडळाचे संचालक किरण वाणी, सुनील चौधरी, हितेश पटेल, सुशील कोठारी, दिनेश मेहेर यांनी मेहनत केली.
130921\img_20210911_180712.jpg~130921\13jal_2_13092021_12.jpg
फोटो कॅप्शन: प्रमुख अतिथी सोबत सत्कारमूर्ती सर्व विद्यार्थी.
छाया: आर. डी. महाजन.~प्रमुख अतिथी सोबत सत्कारमूर्ती सर्व विद्यार्थी. (छाया : आर. डी. महाजन)