धरणगावला घंटानाद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:13 IST2021-07-15T04:13:08+5:302021-07-15T04:13:08+5:30
धरणगाव : राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर अनेक संघटनांच्या प्रतिनिधींच्या वतीने तालुकास्तरीय धरणे व ...

धरणगावला घंटानाद आंदोलन
धरणगाव : राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर अनेक संघटनांच्या प्रतिनिधींच्या वतीने तालुकास्तरीय धरणे व घंटानाद आंदोलन करण्यात आले.
यानंतर विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, धरणगाव यांना देण्यात आले. तसेच ७ मे २०२१ रोजीच्या शासन निर्णयाचा निषेध करण्यात आला. यावेळी हेमंत माळी यांनी सांगितले की, शासन निर्णयानुसार एससी, एसटी, व्हीजेएनटी, एसबीसी, ओबीसींच्या पदोन्नतीतील ३३ टक्के आरक्षणाला स्थगिती देण्यात आलेली आहे म्हणून संघटनेच्या वतीने एससी, एसटी, व्हीजेएनटी, एस.बी.सी, ओबीसींच्या पदोन्नतीतील ३३ टक्के आरक्षणाची मागणी करण्यात येत आहे. यासोबतच ओबीसीलादेखील पदोन्नतीत आरक्षण देण्याची, मराठा आरक्षण लागू करण्याची, नोकरभरती करण्याची मागणी करीत आहोत.
यावेळी प्रोटॉनचे सुनील देशमुख, जिल्हा महासचिव हेमंत माळी, राष्ट्रीय किसान मोर्चाचे गोरख देशमुख, भारतीय युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष नीलेश पवार, आकाश बिवाल, कैलास पवार, महादू अहिरे, रवींद्र बाविस्कर, विश्वनाथ शिरसाठ, उमेश महाजन, मयूर भामरे, पंकज पवार, दीपक सोनवणे, बहुजन नेते व्ही.टी. माळी, आबासाहेब राजेंद्र वाघ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
----
१५सीडीजे४