धरणगाव : येथे समस्त पाटील समाज पंच मंडळातर्फे लहान माळी वाडा पंच भुवनात जगद्गुरू तुकाराम महाराज जयंतीनिमित्त तुकोबांच्या मूर्तीचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी समाजाचे अध्यक्ष भीमराव पाटील व पंच मंडळ, समाज बांधव उपस्थित होते.पालिकेतर्फेही पूजनधरणगाव पालिकेतर्फेही संत तुकाराम महाराज जयंतीनिमित्त लोकनियुक्त नगराध्यक्ष नीलैश चौधरी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष पी.एम.पाटील, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, भानुदास विसावे, काँग्रेसचे चंदन पाटील, राजेंद्र ठाकरे, गोपाळ पाटील, विनोद रोकडे, नंदू पाटील आदी कर्मचारी वृंद, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
धरणगावला संत तुकाराम महाराज जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 00:10 IST