धामगावला पोषण आहाराबाबत मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 23:26 IST2019-09-22T23:26:11+5:302019-09-22T23:26:19+5:30
चाळीसगाव : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेद्वारे धामणगाव येथे नुकतेच पोषण आहाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रकल्प अधिकारी प्रशांत मिटकरी ...

धामगावला पोषण आहाराबाबत मार्गदर्शन
चाळीसगाव : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेद्वारे धामणगाव येथे नुकतेच पोषण आहाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रकल्प अधिकारी प्रशांत मिटकरी यांच्या सुचनेनुसार पर्यवेक्षिका सुनिता चव्हाण यांनी महिलांना पोषण आहाराचे महत्व पटवून दिले. हात धुणे, पालेभाज्या धुणे व स्वच्छता याविषयी देखील चव्हाण यांनी मनोगतात उहापोह केला. फास्टफूड आणि पोषण आहार यातील तफावत व शरिराला होणारे फायदे, तोटे याविषयीही माहिती दिली. यशस्वीतेसाठी स्वयंसेविकांनी परिश्रम घेतले.