धुळ्यात महिलेचा गळा आवळून खून!
By Admin | Updated: April 28, 2017 17:44 IST2017-04-28T17:44:36+5:302017-04-28T17:44:36+5:30
एका शेतात राखणदारीचे काम करणा:या 47 वर्षीय महिलेचा गळा आवळून अज्ञात आरोपीने खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली़

धुळ्यात महिलेचा गळा आवळून खून!
धुळे,दि.28- शहरातील चाळीसगाव चौफुली परिसरातील हॉटेल नालंदामागे असलेल्या एका शेतात राखणदारीचे काम करणा:या 47 वर्षीय महिलेचा गळा आवळून अज्ञात आरोपीने खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली़ याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसात प्रथमदर्शी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आह़े
बेबीबाई राजु गायकवाड (वय 45 रा़ अन्वर नाल्याजवळ, धुळे) असे मयत महिलेचे नाव आह़े त्या चाळीसगाव रोडवरील हॉटेल नालंदा मागील अशोक सखाराम ढिवरे (रा़ संत नरहरी कॉलनी, धुळे) यांच्या शेतातील झोपडीत राहत होत्या़ अनेक वर्षापासून त्या शेतात रखवालदारीचे काम करीत होत्या़ शनिवारी सकाळी 6़30 वाजेच्या सुमारास झोपडी पासून शंभर मिटरच्या अंतरावर बेबीबाई या मृतावस्थेत आढळून आल्या़ प्राथमिक स्थितीवरून बेबीबाई हिचा गळा आवळून खून केल्याचे अंदाज व्यक्त करण्यात आला आह़े
दरम्यान बेबीबाई हिच्या पहिल्या पतीचा मृत्यू झालेला आह़े तर दुसरा पती टेलरींगचे काम करतो़ मात्र तोही तिच्या सोबत राहत नव्हता़ तिला तीन मुले व दोन मुली आहेत़ एक मुलगी तिच्याजवळ राहत होती़ तर दुसरी शिरपुर येथे राहत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली़