धडगावला 80 टक्के मतदान
By Admin | Updated: January 11, 2016 00:30 IST2016-01-11T00:30:12+5:302016-01-11T00:30:12+5:30
धडगाव : नव्यानेच स्थापन झालेल्या येथील नगरपंचायतीसाठी रविवारी 80.48 टक्के मतदान झाले.

धडगावला 80 टक्के मतदान
धडगाव : नव्यानेच स्थापन झालेल्या येथील नगरपंचायतीसाठी रविवारी 80.48 टक्के मतदान झाले. थंडीमुळे सकाळी मतदानासाठी मतदार बाहेर निघाले नाही. मात्र साडेनऊनंतर मतदानाला वेग आला. एकूण सहा हजार 434 पैकी पाच हजार 178 मतदारांनी मतदान केले. यात दोन हजार 499 महिला मतदारांचा, तर दोन हजार 679 पुरुष मतदारांचा समावेश आहे. 17 जागांसाठी 40 उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक यंत्रात बंद झाले. सोमवारी सकाळी 10 वाजता तहसील कार्यालयात मतमोजणीस सुरुवात होईल.