पारोळ्यातील देवयानी चंद्रकांत माळी चित्रकला स्पर्धेत झळकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:19 IST2021-08-26T04:19:52+5:302021-08-26T04:19:52+5:30

तिच्या यशाबद्दल अध्यक्ष उमेश करोडपती, सचिव डॉ.सचिन बडगुजर, मुख्याध्यापक हेमंत कुमार बी. पाटील, विजय बडगुजर आदींनी या ...

Devyani Chandrakant from Parola shone in the gardener painting competition | पारोळ्यातील देवयानी चंद्रकांत माळी चित्रकला स्पर्धेत झळकली

पारोळ्यातील देवयानी चंद्रकांत माळी चित्रकला स्पर्धेत झळकली

तिच्या यशाबद्दल अध्यक्ष उमेश करोडपती, सचिव डॉ.सचिन बडगुजर, मुख्याध्यापक हेमंत कुमार बी. पाटील, विजय बडगुजर आदींनी या विद्यार्थिनीचे कौतुक व अभिनंदन केले. या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य शिक्षक सेनेच्या वतीने नितीन बानुगडे पाटील व शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ना.ज.मो.अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा व कोल्हापूर या जिल्ह्याच्या वतीने ही राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या विद्यार्थिनीला राज्यस्तरीय पारितोषिक प्रमाणपत्र, ५०१ रु. रोख बक्षीस शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, शिक्षक सेना तालुकाध्यक्ष अनिल चौधरी, बापू महाजन, विक्रांत पाटील, मनवंत साळुंखे, लक्ष्मीकांत पाटील, धनेश पाठक यांनी घरी जाऊन देवयानी चंद्रकांत माळी या विद्यार्थिनीचा सत्कार केला. यावेळी तिचे आईवडील उपस्थित होते.

Web Title: Devyani Chandrakant from Parola shone in the gardener painting competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.