शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खास जिलेबी खाण्यासाठी कुटुंबासह येतात या यात्रेत भाविक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 16:39 IST

जळगाव जिल्ह्यातील सायगावच्या यात्रेत रंगणार लोकनाट्याची जुगलबंदी

ठळक मुद्देसायगाव यात्रेतील जिलेबीची चवच न्यारीनाशिक व जळगाव जिल्ह्यातील भाविकांची गर्दीमनोरंजनासाठी भाविकांसाठी लोकनाट्याची जुगलबंदी

गोकुळ मंडळ/ आॅनलाईन लोकमतसायगाव, ता.चाळीसगाव, दि.६ : यात्रा म्हटली म्हणजे धम्मालमस्ती. प्रत्येक यात्रेचे एक वैशिष्ट्य असते. चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथे दत्तजयंतीनिमित्त आयोजित करण्यात येत असलेल्या यात्रेत भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या यात्रेत मिळणारी जिलेबी ही विशिष्ट चवीसाठी प्रसिद्ध असल्याने भाविक याठिकाणी जिलेबी खाण्यासाठी कुटुंबासह येत असतात. पंधरा दिवस चालणाºया यात्रेत प्रत्येक दिवशी लोकनाट्याची जुगलबंदी रंगणार आहे.सायगाव येथे दत्तजयंतीनिमित्त यात्रेला सुरुवात झाली आहे. नाशिक व जळगाव जिल्ह्याच्या सिमेवर असणाºया सायगावात यात्रेसाठी दोन्ही जिल्ह्यातून भाविक येत असतात. चाळीसगाव तालुक्यात महानुभव पंथीय भाविकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे श्री दत्ताच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.

सायगाव यात्रेतील जिलेबीची चवच न्यारीसायगावच्या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी मिळणारी विशिष्ट चव असलेली जिलेबी. जिलेबीची विक्री करणारे अनेक कारागिर या निमित्त यात्रेत दाखल होत असतात. गुळाच्या जिलेबीला साखरेच्या जिलेबीपेक्षा जास्त मागणी आहे. सध्या १०० रुपये किलो दराने यात्रेत जिलेबीची विक्री होत आहे. कुटुंबासह यात्रेत आलेली भाविक जिलेबीचा आस्वाद घेत आहेत.यात्रोत्सवात लोकनाट्याची जुगलबंदीफोर-जी, एच.डी. च्या जमान्यात आजही ग्रामीण भागात पारंपारिक लोककला तसेच लोकनाट्याला प्रतिसाद असतो. नागरिकांच्या दरवर्षाच्या प्रतिसादामुळे याठिकाणी एक दोन नव्हे तर चक्क पाच लोकनाट्यांचे आयोजन केले आहे. सायगावच्या यात्रेत जिलेबीसोबत भाविकांच्या मनोरंजनासाठी लोकनाट्याची जुगलबंदी रंगणार आहे. बुधवार ६ डिसेंबर रोजी मंगला बनसोडे, ८ डिसेंबर रोजी मालती इनामदार, १० डिसेंबर रोजी हरिभाऊ बढे, १२ डिसेंबर रोजी रघुवीर खेडकर तर १५ डिसेंबर रोजी दिलीप काटे यांच्या लोकनाट्याचे आयोजन केले आहे. परिसरातील तरुण व भाविकांसाठी मनोरंजनाची पर्वणी असते.यात्रेवर पावसाचे सावटओखी वादळामुळे सध्या पावसाचे सावट आहे. सध्या ढगाळ वातावरण आहे. पावसाच्या शक्यतेने भाविकांची संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. मात्र शनिवार व रविवारी भाविकांची सर्वाधिक वर्दळ राहणार आहे. या दिवशी सुटी असल्याने नोकरदार तसेच व्यापारी मोठ्या प्रमाणात यात्रेत कुटुंबासह सहभागी होत असतात.

टॅग्स :JalgaonजळगावNashikनाशिक