अमळनेरला भक्तीच्या तालात भाविक दंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:13 IST2021-07-21T04:13:26+5:302021-07-21T04:13:26+5:30
भाविक वाडी संस्थानमध्ये पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन झाले होते. नंदगाव येथील ईश्वर महाराज आपली वारी घेऊन प्रतिपंढरपुरात दाखल झाले. ...

अमळनेरला भक्तीच्या तालात भाविक दंग
भाविक वाडी संस्थानमध्ये पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन झाले होते.
नंदगाव येथील ईश्वर महाराज आपली वारी घेऊन प्रतिपंढरपुरात दाखल झाले. सुनील देव यांनी पूजा केली. महिला व वारकऱ्यांनी डोक्यावर तुळशी व विठ्ठलाच्या पादुका घेऊन ‘असा कसा देवाचा देव... देव एका पायाने लंगडा’ या गाण्यावर ताल धरला होता.
अनेक भाविकांना यंदा वारीला बंदी असल्याने पंढरपूरला जाता आलेले नाही. मात्र बोरी पात्रातील समाधी मंदिरे आणि चंद्रभागेच्या पात्रातील समाधी मंदिरे यात साम्य आहे. त्यामुळेच अमळनेरला प्रतिपंढरपूर संबोधले जाते. म्हणून परिसरातील असंख्य भाविकांनी आज बोरी नदी पात्रात व वाडी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. नदी पात्रात समाधीचे दर्शन घेऊन विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेत होते. वाडी संस्थांतर्फे मास्क आणि सॅनिटायझर यांची काळजी घेतली जात होती. रांगोळीकार नितीन भदाणे यांनी सुंदर व आकर्षक रांगोळी काढली होती.