भरपावसात ‘आईच्या महतीच्या’ कीर्तनात ‘भिजले’ भाविक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:21 IST2021-08-21T04:21:27+5:302021-08-21T04:21:27+5:30
यावेळी मलकापूर येथील ह.भ.प.नितीन महाराज हे रात्री आठ वाजे दरम्यान कीर्तन करीत होते. प्रथम चरण सुरू असतानाच गेल्या ...

भरपावसात ‘आईच्या महतीच्या’ कीर्तनात ‘भिजले’ भाविक
यावेळी मलकापूर येथील ह.भ.प.नितीन महाराज हे रात्री आठ वाजे दरम्यान कीर्तन करीत होते. प्रथम चरण सुरू असतानाच गेल्या कित्येक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या वरुण राजाचे आगमन झाले. यावेळी काही भाविकांनी जवळच्या ओट्यावर आसरा घेतला. टाळकरी मंडळीदेखील जवळच्या ओट्यावर उभी राहिली व आणि कीर्तनकार महाराज भरपावसात छत्रीखाली उभे राहत निरूपण देऊ लागले . यावेळी स्वतः माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा ताराबाई वानखेडे व त्यांचे पुत्र माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राजेश वानखेडे, तसेच शेखर वानखेडे, चारुदत्त वानखेडे, राजेश कोल्हे, फैजपूर येथील नगरसेवक शेख कुर्बान, तसेच राजेंद्र भारंबे हे मात्र समोरच बसून चिंब भिजत कीर्तनाच्या रंगात डुंबले होते. वानखेडे परिवारानेच हा कार्यक्रम आयोजित केला होता.
पावसात कीर्तन करताना नितीन महाराज.