गावाच्या विकासासाठी पक्षभेद, मतभेद नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:13 IST2021-07-20T04:13:10+5:302021-07-20T04:13:10+5:30
नशिराबाद : गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कुठलाही पक्षभेद, मतभेद व राजकारण न करता नशिराबादच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध आहे. त्यासाठी कोट्यवधी ...

गावाच्या विकासासाठी पक्षभेद, मतभेद नाही
नशिराबाद : गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कुठलाही पक्षभेद, मतभेद व राजकारण न करता नशिराबादच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देणार असल्याची ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. येत्या वर्षभरात गावाचा चेहरामोहरा बदलेल व माजी खासदार स्व. वाय. जी. महाजन यांची स्वप्नपूर्ती पूर्णत्वास येईल, असेही प्रतिपादन त्यांनी केले. नशिराबाद येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारतीचे भूमिपूजन सोमवारी झाले, त्यावेळी ते बोलत होते. सहा कोटी रुपये खर्चून आरोग्य उपकेंद्राची इमारत उभी राहणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील होत्या. यावेळी आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे उपस्थित होते. या उपकेंद्रासाठी डीपीडीसीतून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्र्यांचा गावातर्फे जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी सत्कार केला.
प्रत्येक काम आपण गावासाठी करून दिले असल्याचे लालचंद पाटील यांनी सांगितले. नगरपरिषदेची निवडणूक होईपर्यंत गावातील नवीन वस्त्यांसाठी रस्ते, गटारीच्या समस्या सोडविण्यासाठी दीड कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. गावातील विविध समाजांसाठी समाज मंदिरे लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
यावेळी महानगर प्रमुख शरद तायडे, पंचायत समिती माजी सभापती यमुनाबाई रोटे, माजी सरपंच विकास पाटील, उपसरपंच कीर्तीकांत चौबे, भादलीचे सरपंच मिलिंद चौधरी, नशिराबाद शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, ग्रामपंचायत सदस्या सुवर्णा महाजन, वैशाली पाटील, शिवसेना शहरप्रमुख विकास धनगर, चेतन बऱ्हाटे, असलम तनवीर, अरुण सपकाळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चव्हाण, आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन अग्निहोत्री, भादली उपसरपंच संदीप कोळी, सचिन महाजन, ललित बऱ्हाटे, पराग रोटे, जितेंद्र महाजन, जनार्दन माळी, सुनील शास्त्री महाराज, ॲड. प्रदीप देशपांडे, बेळी, निमगाव, बेलव्हाळ गावातील सरपंच, आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेंद्र पाचपांडे यांनी केले. माजी उपसरपंच कीर्तीकांत चौबे यांनी आभार मानले.