जळगाव वृत्तपत्र विक्रेता मंडळातर्फे देवांशचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:21 IST2021-09-15T04:21:56+5:302021-09-15T04:21:56+5:30

जळगाव : शहरातील वृत्तपत्र वाटप करणारा देवांश दीपक सूर्यवंशी रा. दांडेकरनगर या मुलाने प्रामाणिकपणे आशा मौर्या यांचा महागडा मोबाईल ...

Devansh felicitated by Jalgaon Newspaper Vendors Board | जळगाव वृत्तपत्र विक्रेता मंडळातर्फे देवांशचा सत्कार

जळगाव वृत्तपत्र विक्रेता मंडळातर्फे देवांशचा सत्कार

जळगाव : शहरातील वृत्तपत्र वाटप करणारा देवांश दीपक सूर्यवंशी रा. दांडेकरनगर या मुलाने प्रामाणिकपणे आशा मौर्या यांचा महागडा मोबाईल परत केला. त्या निमित्ताने त्याला सत्कार जळगाव वृत्तपत्र विक्रेता मंडळाने केला आहे. गोलाणी मार्केटमध्ये मंगळवारी त्याला मंडळातर्फे बक्षीसही देण्यात आले.

देवांश हा विक्रेते शिवाजी शिंदे यांच्याकडे दांडेकरनगर, प्रेमनगर या परिसरात वृत्तपत्र विक्रीचे काम करतो. यावेळी मंडळाचे अध्यक्ष विलास वाणी यांनी त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले आणि त्याच्या सदिच्छा देखील दिल्या. यावेळी उपाध्यक्ष नितीन चौधरी, रवींद्र जोशी, गोपाळ चौधरी, शिवाजी शिंदे, दिनेश वाणी, मंगेश वाणी, मंगेश जोशी, घनश्याम वाणी, सुनील पाटील, मिलिंद भावसार, महेश सोनार, विजय कोतकर उपस्थित होते.

फोटो - देवांश याचा सत्कार करताना विलास वाणी, नितीन चौधरी, दिनेश वाणी मंगेश जोशी, घनश्याम वाणी आणि इतर.

Web Title: Devansh felicitated by Jalgaon Newspaper Vendors Board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.