मतदार नोंदणी वाढण्यासाठी मतदारांचे लक्ष गट निश्चित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:18 IST2021-09-18T04:18:12+5:302021-09-18T04:18:12+5:30

जिल्ह्यात ‘स्वीप’ कार्यक्रमाची (सिस्टीमॅटीक व्होटर्स एज्युकेशन ॲण्ड इलेक्टोरल पार्टीसीपेशन) प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हास्तरीय सुकाणू समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी ...

Determine voter focus groups to increase voter registration | मतदार नोंदणी वाढण्यासाठी मतदारांचे लक्ष गट निश्चित करा

मतदार नोंदणी वाढण्यासाठी मतदारांचे लक्ष गट निश्चित करा

जिल्ह्यात ‘स्वीप’ कार्यक्रमाची (सिस्टीमॅटीक व्होटर्स एज्युकेशन ॲण्ड इलेक्टोरल पार्टीसीपेशन) प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हास्तरीय सुकाणू समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते.

नवमतदारांची नोंदणीसाठी महाविद्यालयांचा पुढाकार आवश्यक

जिल्ह्यात नवमतदारांची नोंद होण्यासाठी महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा. याकरीता या प्रक्रियेमध्ये मतदारांचा सहभाग वाढण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या लक्ष गटांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. याकरीता युवा, दिव्यांग, स्त्रीया, तृतीयपंथी, स्थलांतरीत नागरिक, शहरी नागरिक, एनआरआय, सेवा मतदार, ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांची जास्तीत जास्त मतदार नोंदणी होण्यासाठी सुकाणू समिती सदस्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी या वेळी केले. तसेच सर्व शासकीय कार्यालय, महामंडळे, सेवाभावी संस्थांनी मतदार नोंदणी वाढण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन केले.

या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अरुण प्रकाश, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दीक्षित, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी, एसटीचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर, नेहरु युवा केंद्राचे समन्वयक नरेंद्र यांच्यासह विविध महाविद्यालय व विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Web Title: Determine voter focus groups to increase voter registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.