पोस्ट कर्मचाऱ्यांचा संप यशस्वी करण्याचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 19:35 IST2019-01-07T19:34:11+5:302019-01-07T19:35:23+5:30
८ व ९ जानेवारी रोजी पोस्ट कर्मचारी संघटनांनी पुकारलेला देशव्यापी संप यशस्वी करण्याचा येथे निर्धार करण्यात आला.

पोस्ट कर्मचाऱ्यांचा संप यशस्वी करण्याचा निर्धार
चाळीसगाव, जि.जळगाव : दि.८ व ९ जानेवारी रोजी पोस्ट कर्मचारी संघटनांनी पुकारलेला देशव्यापी संप यशस्वी करण्याचा येथे निर्धार करण्यात आला.
जुनीच पेन्शन योजना लागू करणे, रिक्त पदांची भरती तत्काळ करणे, खासगी व कंत्राटीकरण बंद करणे, पाच दिवसांचा आठवडा लागू करा, ग्रामीण डाक सेवकांना सेवेत सामावून घेणे आदी प्रमुख मागण्यांसाठी हा दोन दिवसीय संप पुकारण्यात आला आहे.
सोमवारी चाळीसगाव पोस्ट कार्यालयातील कर्मचारी एस.ई.बडगुजर, आर.के.माळी, मनोज करंकाळ, अशोक चौधरी, विजय जाधव, भूषण मोरे, वसिम शेख, रमेश माळी, मुकूंद वडनेरे, सुजीत अहिरे, सुनील वानखेडे आदींनी एकत्र येऊन संप शंभर टक्के यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.