जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्धार महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी रविवारी सकाळी जिल्हा बँकेत घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आला.
जिल्हा बँकेची निवडणूक 'बिनविरोध'चा निर्धार
जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्धार महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी रविवारी सकाळी जिल्हा बँकेत घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आला. उमेदवार निश्चितीसाठी बँकेचे चेअरमन तथा माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय पाच सदस्यांची समितीही गठित करण्यात आली. आठ ते दहा दिवसात आणखी एक बैठक घेण्यात येणार असल्याचे खडसे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. तर इतिहास रचला जाईल.. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय नेते एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ असून ही निवडणूक बिनविरोध झाल्यास इतिहास रचला जाईल. दरवेळी दगडी बँकेवर संचालकपदी वर्णी लागावी यासाठी घोडेबाजार होत असतो. बिनविरोध झाल्यास त्यास लगाम बसणार आहे.
सर्वपक्षीय समिती गठित : खडसे यांचा पुढाकार
चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.सतीश पाटील, अँड.रवींद्र पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ व कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड.संदीप पाटील यांचा समावेश आहे. तालुकानिहाय सर्वेक्षणानंतर या समितीला १५ दिवसात संभाव्य उमेदवारांबाबत अहवाल सादर करण्याची सूचना देण्यात आली आहे.
Web Title: Determination of District Bank's 'Uninterrupted' election