खावटी देण्यास टाळाटाळ करणा:या पतीस अटक
By Admin | Updated: January 23, 2017 00:57 IST2017-01-23T00:57:13+5:302017-01-23T00:57:13+5:30
कोर्टाचे वॉरंट : पुणे येथील पत्नीने गाठले जळगाव

खावटी देण्यास टाळाटाळ करणा:या पतीस अटक
जळगाव : पुणे येथील महिलेचा शनिपेठ परिसरातील रहिवासी पतीविरोधात न्यायालयात खावटीसाठी खटला सुरू आह़े वारंवार खावटीचे वॉरंट काढनूही पतीचे मामा हे पोलीस अधिकारी असल्याने पोलीस त्यास वॉरंट बजावत नव्हत़े अखेर लष्कर न्यायालयाने पतीविरोधात अटक वॉरंट काढल़े या वॉरंटनुसार शनिपेठ पोलिसांनी 22 रोजी पतीला अटक केली आह़े
किरण विनोद बोरनारे (24) रा़ पुणे या तरूणीचा शहरातील जुना खेडी रोड परिसरातील विनोद उर्फ विशाल सुधीर बोरनारे या तरूणाशी विवाह झाला होता़ त्यांना मुलगीही झाली. त्यानंतर दोघांच्या संसारात वादाची ठिणगी पडली़
पोलिसात आपसात तक्रारी दाखल झाल्या़ जिल्हा न्यायालयात खटला चालला़ न्यायालयाने विनोदचा घटस्फोटाचा अर्ज रद्द केला़ त्यानंतर किरणने जळगाव सोडले व माहेरी पुणे येथील आई-वडीलांकडे गेली.
पुणे येथील कोर्टात करणार हजर
दरम्यान, किरणने वडील व वकील अॅड़ संतोष सांगोळकर यांच्यासह रविवारी सकाळी न्यायालयाचे अटक वॉरंट घेवून शनिपेठ पोलीस स्टेशन गाठल़े शनिपेठ पोलीस निरिक्षक आत्माराम प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील मोतीलाल पाटील, अनिल धांडे व जितेंद्र सोनवणे यांनी विनोद बोरनारे याला अटक केली़ दोन लाख सत्तर हजाराची खावटीची रक्कम न देण्यावर तो ठाम असल्याने त्याला पुणे लष्कर न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे प्रधान यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितल़े
पुणे लष्कर कोर्टात खटला
किरणने पती विनोदकडून खावटीसाठी पुणे येथील लष्कर न्यायालयात तक्रार दिली़ खटला चालला. किरणच्या बाजूला निकाल लागला़ खावटी वसूलीसाठी तिने अर्ज दिला़ न्यायालयाने वॉरंट काढून पती विनोदला रक्कम भरण्यास संधी दिली़ विनोदकडून पैसे भरण्यास टाळाटाळ होत होती़