शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
2
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
4
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
5
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
6
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
7
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
8
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
9
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
10
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
11
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
12
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
13
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
14
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
15
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उतरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
16
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
17
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
18
Shakib Al Hasan ने सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याची मान धरली, मारण्यासाठी हात वर केला, Video Viral 
19
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
20
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान

जळगावात निवडणुकीच्या तोंडावर बनावट नोटांचा सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:31 PM

मनपा निवडणुकीच्या तोंडावर शहरात बनावट नोटांचा सुळसुळाट आढळून आला आहे. शनिपेठ भागातील भाजी विक्रेत्यांना तीन ते चार व्यक्तींनी या नोटा दिल्या असून, या भागातील शैलेंद्र सपकाळे यांनी या सर्व नोटा ‘लोकमत’ कडे आणून दिल्या आहेत.

ठळक मुद्देभाजी विक्रेत्यांकडे आढळल्या नोटानागरिक व उमेदवारांनी खबरदारी घेण्याची गरजअंधाराचा फायदा घेत चालविल्या बनावट नोटा

जळगाव : मनपा निवडणुकीच्या तोंडावर शहरात बनावट नोटांचा सुळसुळाट आढळून आला आहे. शनिपेठ भागातील भाजी विक्रेत्यांना तीन ते चार व्यक्तींनी या नोटा दिल्या असून, या भागातील शैलेंद्र सपकाळे यांनी या सर्व नोटा ‘लोकमत’ कडे आणून दिल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीत वापर होणाऱ्या पैशांबाबत नागरिक व उमेदवारांनीही खबरदारी घेण्याची गरज आहे.निवडणुकी दरम्यान मोठ्या प्रमाणात मतदारांना पैसे वाटपाचे गैरप्रकार होत असतात. मतदानाच्या एका दिवसापुर्वी रात्री पैसे वाटप होण्याची शक्यता असते. निवडणुकीच्याच पार्श्वभुमीवर शहरात बनावट नोटांचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. बुधवारी रात्री ७ वाजेच्या सुमरास शनिपेठ भागात काही भाजी विक्रेत्यांकडून भाजीपाला खरेदी केल्यानंतर त्यांना या शंभर रुपयांचा नोटा या काही ग्राहकांनी दिल्या होत्या. रात्री अंधार असल्याने या नोटांची फारशी तपासणी न करता विक्रेत्यांनी या नोटा स्विकारुन घेतल्या. मात्र, सकाळी हा प्रकार एका विक्रेत्याचा लक्षात आला. त्याने इतर विक्रेत्यांशी चर्चा केली. त्या दरम्यान, इतर विक्रेत्यांनी आपल्याकडील नोटा तपासून पाहिल्या असता. त्या स्पष्टपणे बनावट असल्याचे आढळून आले. त्यानंतर शनिपेठ भागातील शैलेंद्र सपकाळे यांनी विक्रेत्यांकडून नोटा घेवून ‘लोकमत’ कडे तक्रार केली.

टॅग्स :JalgaonजळगावMuncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूक