तोतया उपजिल्हाधिका:यास 24 र्पयत कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 12:25 IST2017-07-22T12:25:21+5:302017-07-22T12:25:21+5:30

दोघांना जिल्हा न्यायालयात हजर केले असता समाधान यास 24 र्पयत पोलीस कोठडी

Detective Subdivision: To be held for 24 hours | तोतया उपजिल्हाधिका:यास 24 र्पयत कोठडी

तोतया उपजिल्हाधिका:यास 24 र्पयत कोठडी

लाईन लोकमतजळगाव, दि. 22 - तोतया उपजिल्हाधिकारी समाधान जगताप व ज्योती वाडीले विरोधात जिल्हापेठ पोलिसात पोलीस नाईक इब्राहिम ईस्माईल तडवी यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आह़े दोघांना जिल्हा न्यायालयात हजर केले असता समाधान यास 24 र्पयत पोलीस कोठडी तर ज्योती वाडीले हीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली़ यानंतर तिने जामिनासाठी अर्ज दाखल केला़ त्यावर कामकाज होऊन तिला न्या़ कुळकर्णी यांनी 15 हजार रुपयाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला़ तसेच पोलीस तपासात सहकार्य करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत़ सरकारपक्षातर्फे अॅड़ हेमंत मेंडकी यांनी काम पाहिल़े समाधान याने हा मूळ कोणत्या ठिकाणचा राहणार आहे, त्याचा व्यवसाय काय, त्याने शासकीय कार्यालयांचे बनावट शिक्के, कागदपत्रे तयार केली आहेत काय? या कारणांच्या आधारावर सरकारपक्षातर्फे कोठडीची मागणी केली़

Web Title: Detective Subdivision: To be held for 24 hours