गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह एक अटकेत
By Admin | Updated: October 3, 2016 12:43 IST2016-10-03T12:43:25+5:302016-10-03T12:43:25+5:30
नाहाटा चौफुलीजवळ एक संशयीताकडे गावठी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत गावठी कट्ट्यासह एक जिवंत काडतुसासह आरोपीला पकडण्यात आले

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह एक अटकेत
>ऑनलाइन लोकमत
भुसावळ, दि. 3 - शहरातील नाहाटा चौफुलीजवळ एक संशयीताकडे गावठी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत गावठी कट्ट्यासह एक जिवंत काडतुसासह आरोपीला पकडण्यात आले. रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. आरोपीविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुषार दशरथ फालक (वय ३२, रा़दिनदयाल नगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्रकाश वानखेडे, एएसआय मुरलीधर आमोदकर, हवालदार शरीफोद्दीन काझी, नाईक रवींद्र पाटील, महेंद्र पाटील, युनूस शेख, दीपक पाटील, चालक शरद सुरळकर आदींनी ही कारवाई केली.
नाहाटा चौफुलीजवळील हॉटेल गजाननजवळ आरोपी तुषार फालककडे २० हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा व ५०० रुपये किंमतीचे जिवंत काडतुस आढळल्याने त्याच्याविरुद्ध रवींद्र पाटील यांच्या फिर्यादीनुसार भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.