आरपीएफची सुरक्षा असतानाही, रेल्वेतून प्रवाशांचा सव्वा लाखांचा मोबाइल व लॅपटॉप चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:38 IST2021-09-02T04:38:15+5:302021-09-02T04:38:15+5:30

तन्वीर पटेल हे एका औषध निर्मितीच्या कंपनीत कामाला असून, कंपनीच्या कामासाठी ते जळगावहून २९ ऑगस्ट रोजी विदर्भ एक्स्प्रेसने(गाडी क्रमांक ...

Despite RPF security, a quarter of a million mobile phones and laptops were stolen from the train | आरपीएफची सुरक्षा असतानाही, रेल्वेतून प्रवाशांचा सव्वा लाखांचा मोबाइल व लॅपटॉप चोरीला

आरपीएफची सुरक्षा असतानाही, रेल्वेतून प्रवाशांचा सव्वा लाखांचा मोबाइल व लॅपटॉप चोरीला

तन्वीर पटेल हे एका औषध निर्मितीच्या कंपनीत कामाला असून, कंपनीच्या कामासाठी ते जळगावहून २९ ऑगस्ट रोजी विदर्भ एक्स्प्रेसने(गाडी क्रमांक ०२१०६) या गाडीने बोगी क्रमांक बी-२ मधून मुंबईला जात होते. रात्री जळगावहून पावणेबारा वाजता गाडीत बसल्यानंतर, तन्वीर यांनी लॅपटॉपची बॅग व त्यामध्ये सव्वा लाख रुपये किमतीचा मोबाइल ठेवून ही बॅग आपल्या आसनाच्या शेजारी असलेल्या हुकला लावलेली होती. पहाटे साडेपाच वाजता तन्वीर यांना ठाणे स्टेशनवर जाग आली असता, त्यावेळी मोबाइलची बॅगही जागेवर होती. तन्वीर यांना दादर स्टेशनवर उतरायचे असल्यामुळे तन्वीर हे पुन्हा झोपी गेले आणि दादर स्टेशन आल्यावर त्यांनी आपल्या बॅगेकडे पाहिले असता, जागेवर बॅग आढळून आली नाही. गाडीत सर्वत्र बॅगेची शोधाशोध घेतल्यानंतरही कुठेही बॅग आढळून न आल्याने, तन्वीर यांनी दादर लोहमार्ग पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंदविला आहे.

इन्फो :

तर आरपीएफची सुरक्षा नावालाच :

गेल्या आठवड्यात मुंबईकडून जळगावकडे येणाऱ्या हावडा एक्स्प्रेसमध्ये एका प्रवाशावर चोरट्याने चाकूहल्ला केल्याची घटना घडली. यावेळी गाडीत रेल्वे सुरक्षा बलाची सुरक्षा नसल्यामुळे, हा प्रकार घडला असल्याचे प्रवाशांमधून बोलले जात होते. मात्र, विदर्भ एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा बलाची सुरक्षा असतानाही आणि तोही वातानुकूलित डब्यातून तन्वीर पटेल यांचा दोन लाखांचा दस्तऐवज चोरीला गेला आहे. गाडीत सुरक्षा असतानाही प्रवाशांचे सामान चोरीला गेल्यामुळे, आरपीएफची सुरक्षाही नावालाच असल्याचा सूर प्रवाशांमधून उमटत आहे. या घटनेबाबत भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाचे आयुक्त क्षितिज गुरव यांच्याशी `लोकमत` प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

इन्फो :

विदर्भ एक्स्प्रेसमधून माझा महागडा मोबाइल व लॅपटाॅपसह २ लाखांचा ऐवज चोरीला गेल्याने, खूप धक्का बसला आहे. याबाबत दादर पोलिसात तक्रार दिली आहे. मात्र, दोन दिवस उलटूनही चोरीला गेलेल्या वस्तू सापडलेल्या नाहीत. या एक्स्प्रेसमध्ये पोलिसांची सुरक्षा असतानाही, अशा घटना घडत असतील, तर प्रवाशांनी काय करावे.

- तन्वीर पटेल, प्रवासी

Web Title: Despite RPF security, a quarter of a million mobile phones and laptops were stolen from the train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.