२५ टक्के किंमत कमी करूनही १३ वाळू गटांना प्रतिसाद नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:16 IST2021-03-27T04:16:36+5:302021-03-27T04:16:36+5:30

पर्यावरण समितीकडून मंजुरी मिळाल्यानंतर जिल्ह्यातील २१ वाळू गटांसाठी निविदाप्रक्रिया राबविण्यात आली. २० जानेवारी रोजी निविदा उघडण्यात आल्यानंतर केवळ आठ ...

Despite a 25 per cent reduction in prices, 13 sand groups have not responded | २५ टक्के किंमत कमी करूनही १३ वाळू गटांना प्रतिसाद नाही

२५ टक्के किंमत कमी करूनही १३ वाळू गटांना प्रतिसाद नाही

पर्यावरण समितीकडून मंजुरी मिळाल्यानंतर जिल्ह्यातील २१ वाळू गटांसाठी निविदाप्रक्रिया राबविण्यात आली. २० जानेवारी रोजी निविदा उघडण्यात आल्यानंतर केवळ आठ वाळू गटांचा लिलाव झाला.

मात्र, जळगाव तालुक्यातील भोकर आणि पळसोद, एरंडोल तालुक्यातील टाकरखेडा, रावेर तालुक्यातील वडगाव, आंदलवाडी, निंभोरा बु., केऱ्हाळे बु., धुरखेडा, पातोंडी, दोधे, बलवाडी, अमळनेर तालुक्यातील धावडे, सावखेडा या गटांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या वाळू गटांसाठी जिल्हा प्रशासनातर्फे फेरनिविदा प्रक्रिया राबविली गेली. त्यालाही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर २५ टक्के हातची किंमत कमी करून फेरनिविदा काढण्यात आली आहे. २५ मार्चपर्यंत या गटांसाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. मात्र, २५ टक्के हातची किंमत कमी करूनही एकाही गटासाठी एकही निविदा आली नाही. त्यामुळे आता पुन्हा निविदाप्रक्रिया राबविली जाणार आहे.

जिल्ह्यातील २१ पैकी बांभोरी, घाडवेल (ता. चोपडा), आव्हाणी (ता. धरणगाव), नारणे, वैजनाथ, टाकरखेडा , उत्राण १, उत्राण २ या आठ वाळू गटांचे लिलाव झाले आहेत.

Web Title: Despite a 25 per cent reduction in prices, 13 sand groups have not responded