शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जेठाणीला कॉल करुन दिरानीने केली रेल्वेखाली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 22:19 IST

दुर्घटना : पोलिसांनी बोलण्यात गुंतविण्यात ठेवले, पण आले अपयश

जळगाव : जीवनाला कंटाळली आहे, जीवाचे बरे वाईट करुन घेते असे जेठाणीला मोबाईलवर कॉल करुन दिरानीने धावत्या रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी साडे बारा वाजता असोदा रेल्वेलाईनजवळ घडली. विमलबाई काशिनाथ चौधरी (वय ५५, रा.रामेश्‍वर कॉलनी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान, त्यांनी आत्महत्या का केली हे उशिरापर्यंत स्पष्ट झालेले नव्हते.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमलबाई चौधरी या पती काशिनाथ ओंकार चौधरी आणि मुलगा सचिन चौधरी यांच्यासोबत रामेश्‍वर कॉलनी येथे वास्तव्यास होत्या. बाजार समितीत भाजीपाला खरेदी करुन त्याच ठिकाणी भाजी विक्री करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवित होत्या. बुधवारी सकाळी ७ वाजता विमलबाई नेहमीप्रमाणे भाजीपाला विक्रीसाठी पती व मुलगा सचिन यांच्यासोबत बाजार समितीत गेल्या. दुपारी १२ वाजता पती तसेच मुलगा या दोघांपैकी कुणालाच काही एक न सांगता रिक्षाने त्या थेट असोदा रेल्वे गेटजवळ पोहचल्या. तेथून त्यांनी मोबाईलवरुन जेठाणी तसेच शिवसेनेच्या पदाधिकारी शोभा चौधरी यांना कॉल केला, मी कंटाळली असून जीवाचे बरेवाईट करुन घेते असे सांगून कॉल कट केला.

पोलीस पोहचले पण...दिरानी असोदा रेल्वे गेटजवळील रुळाजवळ आत्महत्या करायला निघाली आहे, तात्काळ त्यांना रोखा म्हणून शोभा चौधरी यांनी शनीपेठ पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांना कळविले. ससे यांनी चौधरी यांना विमलबाई यांना फोनवर बोलण्यात व्यस्त ठेवा, आम्ही घटनास्थळी पोहचतोच असे सांगून तेही तातडीने निघाले. त्यानुसार शोभा चौधरी यांनी पुन्हा दिरानीला कॉल करुन बोलण्यात गुंतविले, पण पोलीस पोहचण्याआधीच रेल्वे आली अन‌् तिच्यासमोर झोकून त्यांनी जीवन संपविले. पोलीस घटनास्थळावर पोहचल्यावर दृष्य पाहून आपणही जीव वाचवू शकलो नसल्याचे शल्य त्यांच्या मनात बोचत होते.पोलिसांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. घटनेची माहिती मिळाल्यावर विमलबाई यांचे पती व मुलगा रुग्णालयात पोहचले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास हवालदार विलास शिंदे करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव