शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

मनपा क्षेत्रातील दारु दुकानांसाठी विधानसभा उपसभापतींना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 13:15 IST

शुल्क परताव्याचाही मुद्दा ऐरणीवर

जळगाव : महापालिकेच्या प्रतिबंधीत क्षेत्र वगळता इतर ठिकाणच्या मद्यदुकानातून कांऊटरवरुन सीलबंद बाटलीतून मद्य विक्रीस परवानगी मिळावी, यासाठी जळगाव जिल्हा रिटेल असोसिएशनने विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांना साकडे घातले आहे, तर दुसरीकडे पुण्यातील असोसिएशनने खासदार शरद पवारयांना साकडे घालून या प्रश्नावर तोडगा काढण्याची विनंती केली आहे. उच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी देताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांना विचारणा केली आहे.कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्यात रेड झोनमध्ये मद्य विक्रीस परवानगी नाही. इतर ठिकाणी परमीट रुममधील शिल्लक साठा विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. जळगाव मनपाच्या क्षेत्रात मात्र मद्य विक्रीला परवानगी नाही. वाईन शॉप व परमीट रुमधारकांकडे मोठ्या प्रमाणात मद्याचा साठा शिल्लक असून त्यातील बियरला तर विक्रीसाठी मुदत दिलेली आहे. मुदतीत हा साठा विक्री झाला नाही, तर निकामी ठरतो, परिणामी व्यावसायिकांना लाखो रुपयांचा फटका बसणार आहे. आधीच लॉकडाऊनमुळे दोन महिन्यापासून व्यवसाय बंद असल्याचे तो मोठा फटका बसला आहे. जिल्हा रिटेल वाईन असोसिएशनचे अध्यक्ष ललित पाटील यांनी विधानसभा उपसभापतींसह जिल्हाधिकाऱ्यांनाही साकडे घातले आहे. दरम्यान, मुंबईत आॅनलाईन पध्दतीत बनावट मद्याची विक्री झाल्याचा प्रकार उघड झाला. त्यामुळे ही ग्राहक व शासनाचीही फसवणूक आहे.इतर करात सवलत मिळावीअनेक शहरात परमीट रुम व लॉजिंग अशी व्यवस्था आहे. लॉकडाऊनमुळे दोन महिन्यापासून व्यवसाय बंद आहे, त्यामुळे या काळात लॉजिंग, वीज व इतरांवर लागू असलेली जीएसटी तसेच दारु दुकानांसाठी असलेल्या शुल्कात सुट मिळावी म्हणून पुणे असोसिएशनने खासदार शरद पवार यांना साकडे घातले. त्यावर पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. जळगावच्या असोसिएशनने विधानसभा उपसभापतींकडे हा विषय मांडला. त्यावर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे हा विषय मांडून तोडगा काढण्याची विनंती केली आहे....तर लाखो रुपयांचे नुकसानजळगाव जिल्हा रिटेल असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मनपा क्षेत्रातील प्रतिबंधीत क्षेत्र वगळून इतर ठिकाणचे वाईन शॉप, परमीट रुम, बियर शॉप व देशी दारु दुकानातून सीलबंद बाटली कांउटरवरुन विक्रीस परवानगी द्यावी. बहुतांश व्यावसायिकांकडे मोठ्या प्रमाणात बियरचा साठा शिल्लक असून त्याची मुदत संपण्यावर आलेली आहे. मुदतीत ही बियर विक्री झाली नाही तर व्यावसायिकांना लाखो रुपयांचा भुर्दंड बसेल. परवानगी मिळाल्यानंतर सोशल डिस्टन्सिग व इतर नियमांचे पालन करण्याचे आश्वासन असोसिएशनने दिले आहे.शासनाने मद्य विक्रीला परवानगी देताना वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळे निकष लावले आहेत. मनपा क्षेत्रात प्रतिबंधीत क्षेत्र वगळून आम्हाला व्यवसाय करण्यास परवानगी मिळावी. शहरात आॅपलाईन विक्री करणे शक्य नाही. अवघा ७ टक्के नफा मिळतो. त्यात डिलवरी करणाºयांचा खर्च पाहता हे परवडत नाही. त्याशिवाय बनावट मद्याची विक्री झाल्याचे प्रकार मुंबईत उघड झाले. त्यामुळे ग्राहकाचा विश्वासघात व सरकारची फसवणूक होत आहे.-ललित पाटील, अध्यक्ष, जळगाव जिल्हा रिटेल असोसिएशन

टॅग्स :Jalgaonजळगाव