शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

एनएमएमएस शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 21:42 IST

जळगाव : आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण थांबू नये म्हणून शालेय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती ...

जळगाव : आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या विद्यार्थ्यांचे उच्चशिक्षण थांबू नये म्हणून शालेय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस) दिली जाते. मात्र, सन २०१३ पासून शेकडो विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला नसल्याची बाब समोर आली असून अनेक पालकांनी याबाबत शिक्षण विभागात तक्रार केली आहे़महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत आठवीसाठी राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत असते़ मात्र, सन २०१३ पासून बहुतांश विद्यार्थ्यांना अजूनही शिष्यवृत्तीच्या लाभाची प्रतीक्षा लागून आहे़ दुसरीकडे अनिल सोनवणे यांच्यासह काही पालकांनी नुकतीच माध्यमिक शिक्षण विभागात येवून दोन वर्षांपासून आपल्या पाल्यांना शिष्यवृत्ती मिळाली नसल्याची तक्रार केली आहे़ एवढेच नव्हे तर काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे तीन ते चार हप्ता मिळाल्यानंतर शिष्यवृत्तीचं मिळालेली नाही़ म्हणजेच उच्च शिक्षण थांबू नये यासाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती मिळत नसल्यामुळे गोरगरिब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून देखील वंचित राहण्याची वेळ नाकारता येत नाही़विद्यार्थ्यांची पाठविली माहितीपालकांनी केलेल्या तक्रारीनंतर माध्यमिक शिक्षण विभागाकडून शासनाला ती तक्रार कळविण्यात आली आहे़ त्यानुसार शासनाकडून विद्यार्थ्यांची माहिती आॅनलाइन आणि आॅनलाइन पध्दतीने पाठविण्याच्या सूचना केल्या़ त्यानुसार दहावी, अकरावी व बारावीच्या ७४९ विद्यार्थ्यांची आॅनलाइन माहिती सादर करण्यात आली असून नववी, दहावी, अकरावी आणि बारावी अशा काही ८१५ विद्यार्थ्यांची पुणे येथे आॅफलाइन पध्दतीने माहितीने पाठविण्यात आली आहे़काय आहे योजनाआर्थिकदुष्टया दुर्बल घटकातील या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाला हातभार लागावा म्हणून ही शिष्यवृत्ती दिली जाते. इयत्ता आठवीत असताना विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्यात येत असते़ त्यानंतर इयत्ता नववीपासून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लाभ मिळतो़ अर्थात योजनेत नववी ते बारावीपर्यंतच्या पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी बारा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. म्हणजेचं दरमहा १ हजार रूपये दिले जाते़ सलग चार वर्षे ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्याला मिळते.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव