चौधरी बंधूंना हद्दपारीची नोटीस

By Admin | Updated: September 23, 2014 10:25 IST2014-09-23T10:25:24+5:302014-09-23T10:25:24+5:30

आगामीविधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी व त्यांचे बंधू अनिल चौधरी यांना पोलिसांनी हद्दपारीची नोटीस बजावली आहे.

Deportation Notice to Chaudhary brothers | चौधरी बंधूंना हद्दपारीची नोटीस

चौधरी बंधूंना हद्दपारीची नोटीस

भुसावळ : आगामीविधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी व त्यांचे बंधू अनिल चौधरी यांना पोलिसांनी हद्दपारीची नोटीस बजावली असल्याची माहिती भुसावळचे उपविभागीय पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांनी दिली. 

या नोटीसमुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान संतोष चौधरी यांनी आपल्याला कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचे 'लोकमत'ला सांगितले. या आधीच अनिल चौधरी यांच्यावर हद्दपारीची कारवाई झाली आहे. त्यांनी दोन वर्षे अशी शिक्षा भोगली आहे.
---
कोणतीही नोटीस मिळाली नाही. २00४ ते २0१४ या दरम्यान बाजारपेठ पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल नाही. जी काही नोटीस असेल ती राजकीय असेल. अशा नोटिसीला राजकीय पद्धतीनेच उत्तर दिले जाईल.- संतोष चौधरी, माजी आमदार
 
संतोष चौधरी व अनिल चौधरी यांना भुसावळातून हद्दपार करण्यासंदर्भात त्यांच्या घरी नोटीस बजावण्यात आली आहे. - सतीश देशमुख, पोलीस निरीक्षक 
 

Web Title: Deportation Notice to Chaudhary brothers