सर्जनशील लेखकाचे जाणे दुःखदायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:21 IST2021-09-05T04:21:49+5:302021-09-05T04:21:49+5:30
जळगाव : मराठीच नव्हे तर भारतीय नाट्यसृष्टीतील महत्वाचे नाटककार, लेखक म्हणून ओळखले जाणारे जयंत पवार यांच्या निधनाने आपण एका ...

सर्जनशील लेखकाचे जाणे दुःखदायक
जळगाव : मराठीच नव्हे तर भारतीय नाट्यसृष्टीतील महत्वाचे नाटककार, लेखक म्हणून ओळखले जाणारे जयंत पवार यांच्या निधनाने आपण एका उत्तम व संवेदनशील लेखकाला गमावले आहे. अशा सर्जनशील लेखकाचं जाणे हे दु:खदायक असल्याच्या भावना ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त पद्मश्री डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी शनिवारी सायंकाळी व्यक्त केले.
परिवर्तनतर्फे `श्रध्दांजली : एका थोर नाटककाराला` श्रद्धांजली सभेत ते बोलत होते. यावेळी कथालेखक उदय प्रकाश, जेष्ठ कादंबरीकार रंगनाथ पठारे, जेष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे, जेष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष, कवी श्रीकांत देशमुख, अभिनेते संजय नार्वेकर, रंगकर्मी शंभू पाटील, नंदू माधव उपस्थित होते. आदराची भावना सगळ्याच रंगकर्मीमध्ये होती. अशी भावना सुप्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे यांनी मांडली. तर शंभू पाटील यांनी रेपटाईल कॉम्प्लेक्स या संकल्पनेच्या आधारे त्यांनी लिहिलेले 'काय डेंजर वारा सुटला आहे', हे महत्त्वाचं नाटक लिहिले असल्याचे सांगितले.
या सभेत राज्यातील साहित्य, नाट्य क्षेत्रातील कलावंतांनी सहभाग घेतला होता. श्रद्धांजली सभेचे आयोजन परिवर्तनच्या वतीने नारायण बाविस्कर व मंजुषा भिडे यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले.