प्रवेश नाकारून जेवणही केले बंद
By Admin | Updated: October 10, 2015 01:05 IST2015-10-10T01:05:58+5:302015-10-10T01:05:58+5:30
नंदुरबार : तळोदा वसतिगृहातील 85 विद्यार्थिनींना प्रवेश नाकारण्यात आला असून, त्यांना जेवण देणे बंद केल्याच्या निषेधार्थ भारतीय विद्यार्थी मोर्चातर्फे निषेध करण्यात आला आहे.

प्रवेश नाकारून जेवणही केले बंद
नंदुरबार : तळोदा वसतिगृहातील 85 विद्यार्थिनींना प्रवेश नाकारण्यात आला असून, त्यांना जेवण देणे बंद केल्याच्या निषेधार्थ भारतीय विद्यार्थी मोर्चातर्फे निषेध करण्यात आला आहे. आधी प्रवेश देण्याचे आश्वासन देऊन नंतर घूमजाव केल्याचा आरोप विद्यार्थी मोर्चातर्फे करण्यात आला आहे. जिल्हाधिका:यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तळोदा येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहात प्रवेश भरती प्रक्रियेत 85 डे-स्कॉलर मुलींचे ऑनलाइन फॉर्म भरून व अधिकृत फॉर्म वसतिगृहात जमा करून या मुलींना स्थानिक प्रकल्प प्रशासनाने राहण्याची व जेवणाची परवानगी दिली. वाढीव कोटय़ाची शिफारस करण्यात आली असून कोटा वाढवून येईर्पयत राहता येईल, असे गृहपालांनी सांगितले होते. मात्र 20 दिवसानंतर 85 मुलींना सहा दिवसांपासून जेवण देणे बंद केल्याचा आरोप भारतीय विद्यार्थी मोर्चातर्फे करण्यात आला आहे. आधी आश्वासन का देण्यात आले, डे-स्कॉलर म्हणून का ठेवले? विद्यार्थिनींची दिशाभूल करण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात येत असल्याचा आरोप करीत चौकशीची मागणी करण्यात आली आहे. वाढीव कोटा येईर्पयत मुलींना वसतिगृहात राहण्याची परवानगी मिळावी व त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणीही जिल्हाध्यक्ष ईश्वर वसावे यांनी केली आहे.