जिल्ह्यात डेंग्यूचा कहर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:19 IST2021-08-23T04:19:34+5:302021-08-23T04:19:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हाभरात गेल्या ७ महिन्यांच्या तुलनेत ऑगस्टमध्ये डेंग्यूचा कहर वाढला आहे. संशयित रुग्णांची संख्या १०४ ...

Dengue is rampant in the district | जिल्ह्यात डेंग्यूचा कहर वाढला

जिल्ह्यात डेंग्यूचा कहर वाढला

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्हाभरात गेल्या ७ महिन्यांच्या तुलनेत ऑगस्टमध्ये डेंग्यूचा कहर वाढला आहे. संशयित रुग्णांची संख्या १०४ वर पोहोचली आहे. यात सर्व दवाखाने सध्या फुल्ल झाले आहेत. शासकीय यंत्रणेत रुग्ण उपचार घेत आहेत. यात शहरातील रुग्णांच्या संख्येतही कमालीची वाढ झाली आहे.

पावसाचे प्रमाण वाढल्यानंतर रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ दिसत आहे. यात जुलैपर्यंत शांत असलेल्या अन्य आजारांनी आता डोके वर काढले आहे. यात डेंग्यूचा प्रादूर्भाव प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोविडमधून उसंत मिळाल्यानंतर आता डेंग्यूने डोके वर काढल्याने जिल्हा हिवताप विभाग सतर्क झाला आहे. त्यांच्याकडे नियमित येणाऱ्या नमुन्यांची संख्या वाढली आहे.

नमुने यायला उशिरा

डेंग्यूसदृश रुग्णांचे नमुने घेऊन ते एनआयव्ही पुणे येथे पाठविले जातात. या ठिकाणी मात्र, जोपर्यंत ९० नमुने जमा होत नाहीत. तोपर्यंत तपासणी होत नाही. अशा स्थितीत जिल्हा हिवताप विभागाने पाठविलेले नमुने येण्यास आठ ते दहा दिवसांचा अवधी लागत आहे. अशा स्थितीत रुग्णाचे लवकर निदान शासकीय यंत्रणेमार्फत होत नसते. रक्त नमुन्यांमध्ये प्लेटलेट्स कमी झाल्यानंतर खासगी यंत्रणेत डेंग्यूचे निदान केले जात आहे. डेंग्यूत प्रामुख्याने प्लेटलेट्सचे प्रमाण घटत असते.

संशयित कंसात बाधित रुग्णांची संख्या

जानेवारी ६ (४)

फेब्रुवारी ० (०)

मार्च ६ (१)

एप्रिल ० (०)

मे ८ (२)

जून २५ (१२)

जुलै २९ (३)

ऑगस्ट ३० (५)

त्या डॉक्टरांची प्रकृती स्थीर

डेंग्यू झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या एका सहयोगी प्राध्यापकास अन्य त्रास होत असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. जीएमसीत त्यांना आवश्यक त्या सुविधा नसल्याने त्यांना खासगीत हलविण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती आहे.

जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाच्या एका डॉक्टरांना आठवडाभरापूर्वी डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरुवातीला सामान्य कक्षात व नंतर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात आले होते.

Web Title: Dengue is rampant in the district