जळगावात आढळला डेंग्यूचा रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 13:27 IST2017-08-17T13:27:23+5:302017-08-17T13:27:47+5:30
परिसरात आणखी चार जणांना डेंग्यची लागण झाल्याची तक्रार

जळगावात आढळला डेंग्यूचा रूग्ण
ठळक मुद्देआणखी चार जणांना डेंग्यची लागण झाल्याची तक्रार रक्त नमुन्यांची तपासणी केली असता त्याला डेग्यू झाल्याचे निष्पन्न
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 17 शहरातील संभाजी नगरात 16 वर्षाच्या मुलास डेंग्यूची लागण झाल्याने त्याला खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. परिसरात आणखी चार जणांना डेंग्यची लागण झाल्याची तक्रार असून या मुलाच्या पालकांनी बुधवारी मनपात महापौर नितीन लढ्ढा यांची भेट घेऊन अस्वच्छतेबाबत तक्रार केली. ताप आल्याने या मुलास खाजगी रूग्णालयात दाखल केले होते. रक्त नमुन्यांची तपासणी केली असता त्याला डेग्यू झाल्याचे निष्पन्न झाले.